Jump to content

कच्छ एक्सप्रेस

कच्छ एक्सप्रेसचा फलक
कच्छ एक्सप्रेसचा मार्ग

कच्छ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भूज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भूज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. सयाजीनगरी एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन कच्छ एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९१३१वांद्रे टर्मिनस – भुज१७:१००९:२५रोज
१९१३२भुज – वांद्रे टर्मिनस१९:५०११:२५रोज

मार्ग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे