Jump to content

कक्षीवान

कक्षीवान हा एक ऋग्वेदात नाव आलेला ऋषी आहे. त्या पित्याचे नाव दीर्घतमस् व आईचे उशिस् होते. उशिस् ही कलिंगाच्या राणीची दासी होती.

कक्षीवान आपले विद्याध्ययन संपवून घरी चालला होता. चालून चालून दमला आणि जमिनीवरच एका झाडाखाली झोपला. त्या रस्त्याने राजा भावयव्य आपल्या लव्याजम्यासहित जात होता. त्याने कक्षीवानाला पाहिले. राजा भावयव्य आणि त्याची पत्नी झोपलेल्या कक्षीवानाचा देखणेपणा पाहून इतकी भाळली की त्यांनी आपल्या दहाही मुलींचे विवाह कक्षीवानाशी केले. त्याला लग्नात दहा रथ आणि एक हजार साठ गायी दिल्या.

पुढे कक्षीवानाने अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्यावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला 'वृचया' नामक वधू दिली.