Jump to content

कंचना

कांचना किल्ला हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात स्थित आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सातमाळ्याच्या डोंगररांगेत आहे.

हा किल्ला सध्या भग्नावस्थेत असून त्यावर थोड्याफार प्रमाणावर ऐतिहासिक अवशेष त्याचप्रमाणे गुहा व टाक्यांचे अस्तित्व पहावयास मिळते.पचन किल्ल्याच्या पायथ्यापासून जाणाऱ्या वाटेस काचन बारी म्हणून प्रसिद्ध आहे शिवाय या रस्त्याचे खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली त्यावेळेस परतीच्या प्रवासात येत असताना.व सोबत लुट नेत असताना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झाला होता मोगल सरदार दाऊदखान हा चांदवड येथे मुक्कामास राहून छत्रपती शिवरायांना अडवण्याचा विचार करीत होता यादरम्यान त्याने चांदवड वन काचन बारी जवळ छत्रपती शिवरायांना गाठून त्यांच्या जवळ असलेला ऐवज हा पुनश्च मोगलांच्या ताब्यात घेण्याचे ठरवले होते. मात्र छत्रपती शिवरायांनी अतिशय धैर्याने काचंन बारीच्या मोगलांशी सामना करून तुंबळ युद्ध 17 ऑक्टोंबर 1670 रोजी लढले यात मोगलांचा दारुण पराभव झाला.

छत्रपती शिवरायांनी या युद्धामध्ये स्वतः सहभाग घेतला व हे युद्ध गनिमी कावा या तंत्राचा वापर न करता बेरीर गिरी या तंत्राचा वापर करून प्रचंड ताकदीने शत्रु सैन्यावर हमला करणे अशा प्रकारे युद्ध करून हे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे युद्ध ठरले होते. कांचन किल्ल्याजवळ झालेल्या युद्धातील विजयानंतर छत्रपती शिवराय वनी दिंडोरी मार्गेेेेेेे नाशिक व तेथून त्र्य त्रंबकेश्ववर मार्गे कोकणात उतरलेत

कसे पोहचावे..

कांचन बारी या ठिकाणी नाशिक बस उपलब्ध होऊ शकते. नाशिक देवळा बस मध्ये खेलदरी या गावाजवळ उतरून पायी पायी आपण कांचन भारी पर्यंत पोहोचू शकतो किंवा वडाळीभोई येथून उत्तरेला शिंदे गाव वा जवळून आपण कांचन भारी पर्यंत पोचू शकतो छत्रपती शिवरायांनी कांचना डोंगराजवळ केलेल्या युद्धाची जागा अजूनही निश्चित नाही.