Jump to content

औषधप्रभावशास्त्र

औषध घेतल्यानंतर शरीरावर किंवा शरीरातील किंवा शरीरावरील सूक्ष्मजीवांवर किंवा परजिवींवर होणाऱ्या जैवरासायनिक व शरीरक्रियाशास्त्रीय प्रभावांचा तसेच औषधाच्या प्रभावनिर्मिती पद्धतींचा आणि औषधाची संहती व त्याचा प्रभाव यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे औषधप्रभावशास्त्र (फार्मकोडायनमिक्स) होय.

औषध शरीरात/शरीरावर काय करते याचा अभ्यास म्हणजे औषधप्रभावशास्त्र तर शरीर औषधाला/औषधावर काय करते याचा अभ्यास म्हणजे औषधगतिकी अशी सारांशरूप व्याख्या नेहमी दिली जाते.