Jump to content

औषधगतिकी

बाहेरून सजीवांना दिल्या गेलेल्या द्रव्यांच्या भवितव्याचा अभ्यास करणारी औषधशास्त्राची शाखा म्हणजे औषधगतिकी (फार्मकोकायनेटिक्स) होय. औषधगतिकीला रस असणाऱ्या द्रव्यांमध्ये औषधी कारके, संप्रेरके, पोषघटक आणि विषे यांचा समावेश होतो.

औषधगतिकीमध्ये दिलेल्या औषधाच्या शोषण आणि वितरणाच्या पद्धती, शरीरात त्याच्यावर होणारे रासायनिक बदल आणि औषधाच्या चयापचयातून निर्माण झालेल्या उत्पादितांच्या प्रभावांचा व त्यांच्या उत्सर्जनमार्गांचा अभ्यास यांचा समावेश होतो. औषधगतिकीचा अभ्यास नेहमी औषधप्रभावशास्त्रासोबत केला जातो.