Jump to content

औद्योगिक प्रशिक्षण संस्था

आय.टी.आय.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute) ही शासनाची किंवा शासनाची मान्यता असलेली शिल्पकारागीर प्रशिक्षण देणारी संस्था होय. कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थांना स्वावलंबी बनवणे आहे हे या संस्थांचे उद्दिष्ट असते.

महाराष्ट्र राज्यात ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ३८१ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्था १३४ प्रकारच्या व्यवसायांचे (ट्रेड)चे प्रशिक्षण देतात. या संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे १ लाख ५० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात.

आयटीआयमधील प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय खुला असतो.. आयटीआय केलेले लोक नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचारही करू शकतात. इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आयटीआय मधील अभ्यासक्रमांमध्ये बदल केले आहे. इंडस्ट्रीसोबत टाय-अप करून नव्या नव्या योजना हाती घेण्यात येत असतात.

प्रवेशासाठी अर्ज करण्याची पद्धत

इयत्ता १० वीच्या निकालानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया http://admission.dvet.g

ov.in वर सुरू होते. प्रवेश व कोर्स निवडण्याची संधी गुणवत्तेच्या आधारे ठरवली जाते.

रोहतकमधील एक निर्माणाधीन आयटीआय

आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जन्म दाखला, जातीचा दाखला SC/ST/OBC / VJ/DT/NT-A,B,C,D, नॉन क्रीमी लेयर दाखला OBC / VJ/DT/NT-A,B,C,D,

प्रवेशासाठी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रती जोडलेला अर्ज सादर करावा. सर्व कागद पत्रांच्या झेरॉक्स प्रती स्व-साक्षांकित असाव्यात.

व प्रवेश फी

वसतीगृहात राहण्याची सोय

प्रवेशित सर्व उमेदवारांना त्या संस्थेच्या वसतीगृहातील खोल्या मिळतीलच याची शाश्वती नाही. उमेदवाराने वसतीगृह, जागेची उपलब्धता, शुल्क इत्यादी गोष्टींबाबत संबंधित औ.प्र.संस्थेच्या कार्यालयामधून खात्री करून घ्यावी.

रॅगिंग प्रतिबंधाबाबत कार्यवाही

महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा हा १५ मे १९९९पासुन लागू झाला आहे त्यानुसार

कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात किंवा आवाराबाहेर रॅगिंगला मनाई आहे.

प्रशिक्षणार्थी, त्याचे पालक किंवा संस्थेतील शिक्षक वा संस्थेचे प्रमुख संस्थेमध्ये रॅगिंग करणाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार करू शकतात.

रॅगिंगमध्ये येणाऱ्या गोष्टी

प्रशिक्षणाथींची खिल्ली उडवणे, त्याच्याशी उद्धटपणे वागणे, त्याला वाईटपणे हाताळणे, त्याला दंगलखोर वा बेशिस्त कृत्यांमध्ये गोवणे आदी शारीरिक वा मानसिक छळाचे प्रकार.

ज्यामुळे प्रशिक्षणार्थीला त्रास, दुःख, शारीरिक व मानसिक क्षती होईल असे कृत्य.

प्रशिक्षणार्थीमध्ये धास्ती, भीती किंवा काळजी निर्माण होईल अशी कृती.

प्रशिक्षणार्थीस तो सामान्यरीत्या करणार नाही किंवा आणि ज्याचा परिणाम लाजिरवाणी भावना निर्माण होण्यास, यातना होण्यास किंवा गोंधळ निर्माण होण्यास कारणीभूत होईल असे कुठलेही कृत्य करण्यास लावणे.

प्रशिक्षणार्थीच्या अभ्यासावर वा मानसिक स्थितीवर ज्याचा वपरीत परिणाम होईल अशी कृती.

उपाययोजना

प्रशिक्षणार्थीने खोडसाळपणे वागणाऱ्या प्रशिक्षणार्थीविरुद्ध तक्रार प्राचार्यांकडे करावी.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील रॅगिंग करणाऱ्या वा तसे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या प्रशिक्षणार्थीविरुद्ध करावयाची कार्यवाही: -

१. रॅगिंग करणाऱ्या व्यक्तीस होणारी शिक्षा ही जरब बसवेल अशी व कठोर असावी ज्यामुळे अशा प्रकाराची पुनरावृत्ती होण्यास प्रतिबंध होईल.
. २. रॅगिंगच्या प्रत्येक घटनांची संस्थेच्या आधीकाऱ्यांमार्फत जवळच्या पोलीस सटेशनमध्ये एफ.आय.आर. देऊन नोंद केली पाहिजे.
३. रॅगिंग शिक्षेशी संबंधीत किंवा रॅगिंगच्या प्रत्येक घटनेतील तथ्यावर आधारीत व रॅंगीगच्या घटनेचा प्रकार व तीव्रता बघुन संस्था योग्य तो निर्णय घेईल.
४. घडलेल्या गुन्हाचा प्रकार व तीव्रता बघून दोषी आढळलेल्या प्रशिक्षणार्थीस/व्यक्तीस संस्थास्तरावर खालीलपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त एकत्रित शिक्षा होईल.

१. प्रवेश रद्द करणे
२, वर्गातील उपस्थित राहण्यापासून निलंबित करणे.
३. शिष्यवृत्ती रद्द करणे
४. परीक्षा वा इतर मूल्यांकन प्रक्रिरीयेतील सहभागास प्रगतबंध करणे
५. निकाल रोखून ठेवणे.
६. कोणत्याही विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे, युवा उत्सवाचे संस्थेचे प्रतीनिधित्व करण्यापासून हद्दपार करणे.
७. वसतीगृहातून निलंबित करणे/हकालपटटी करणे.
८. संस्थेमधून एक ते चार सेमिस्टरपर्यंतच्या कालावधी करीता प्रशिक्षणार्थ्याला तात्पुरते अथवा कायमचे काढून टाकणे.
९. संस्थेमधून हकालपटटी आणि दुसऱ्या कोणत्याही संस्थेत प्रवेशास बंदी घालणे.
१०. सामूहिक शिक्षा

नियमांचे उल्लंघन

जे प्रशिक्षणार्थी संस्थेचे नियमांचे उल्लंघन करतील त्यांचेवर सुद्धा कठोर कार्यवाही करण्यात येते. सर्व प्रशिक्षाणार्त्यांना संथेचे सर्व नियम पाळणे बंधन कारक असते..

प्रशिक्षणार्थ्याने द्यावयाचे हमीपत्र

१. NCVT/SCVTच्या परीक्षा प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या परीक्षेसंबंधी - परीक्षेस बसण्याच्या संधी, प्रत्येक सेमिस्टरसाठी किमान उपस्थिती, नकारात्मक गुणपद्धती- व असे इतर नियम जे NCVT/SCVT यांनी वेळोवेळी ठरवून दिलेले आहेत, त्या नियमांना मी बांधील राहील.

२. मी ह्यानुसार मान्य करतो की शासनाकडून लागू करण्यात आलेल्या नियम, कायदा आणि प्रशासन माझ्यावर बंधनकारक असेल.. मी ह्यानुसार हमी देत आहे की, संस्थेच्या आवारात किंवा आवाराबाहेर माझ्यावर या शिस्तीविषयक नियमामुळे शिक्षा होईल अशी बेशिस्तपणाची कोणतीही वर्तणूक करणार नाही.

३. संस्थाशासन/ SCVT/ NCVT यांनी ठरवून दिलेली शिस्त-वागणूक बाबतच्या नियमांचे माझ्याकडून उल्लंघन झाल्यास संस्थेच्या प्राचार्यांना मला संस्थेतून निलंबित करण्याचे पूर्ण अधिकार राहतील.

३. प्रत्येक सत्रासाठी सैद्धांतिक व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सैद्धान्तिक व प्रात्यक्षिक वर्गामध्ये ८० टक्के पेक्षा कमी उपस्थिती असल्यास मला परीक्षेस बसू दिले जाणार नाही या अटीची मला पूर्णपणे जाणीव आहे.

४. NCVT/SCVT यांनी नेमून दिलेल्या विहित वेळेत गृहपाठ, जॉब, जर्नलल्स, चित्रकला इ. सादरीकरण समाधानकारकरीत्या करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे.

प्रशिक्षणादरम्यान मिळणाऱ्या सुविधा

५० टक्के प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येकी दरमहा विद्यावेतन
एसटी, रेल्वे प्रवास सवलत
खेळ, करमणूक व वैद्यकीय मदत यांची विनामूल्य सोय
आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा.
अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना टूल कीट.

हे सुद्धा पहा