Jump to content

औक्षण

उक्ष= शिंपडणे, या धातूवरून हा शब्द बनला आहे. सायणाने औक्ष म्हणजे प्रलेपण द्रव्य असा त्याचा अर्थ दिला आहे. हिंदू धर्मामध्ये औक्षण हे शुभ मानले जाते. लग्न कार्याच्या वेळी अथवा इतर शुभ प्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्यांचे मंगलकार्य असेल त्यास त्यांच्या तोंडाभोवती सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दिपादियुक्त ताम्हन; सदर ताम्हन ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात. सोबतच वास्तवात एखाद्याचे औक्षण करणे हे धार्मिक फायद्याचे मानले जाते.

१. औक्षणाचा धार्मिक अर्थ= औक्षण हे विश्वातील दैवी लहरांचे स्वागत करण्यासाठी असते असे देखील मानले जाते. २. औक्षणाचे महत्त्व= औक्षण करत असताना, व्यक्तीच्या शरीराभोवती तयार झालेल्या प्रकाशाची एक हलणारी संरक्षणात्मक म्यान तयार होते आणि त्या प्रकाशित दिव्याच्या सहाय्याने तयर होतात.


संदर्भ

भारतीय संस्कृती कोश खंड १