ओहायो
| ओहायो Ohio | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | कोलंबस | ||||||||||
| मोठे शहर | कोलंबस | ||||||||||
| सर्वात मोठे महानगर | क्लीव्हलंड महानगर, सिनसिनाटी महानगर | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ३४वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १,१६,०९६ किमी² | ||||||||||
| - रुंदी | ३५५ किमी | ||||||||||
| - लांबी | ३५५ किमी | ||||||||||
| - % पाणी | ८.७ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत ७वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १,१५,३६,५०४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ९८.९/किमी² (अमेरिकेत ९वा क्रमांक) | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १ मार्च १८०३ (१७वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-OH | ||||||||||
| संकेतस्थळ | www.ohio.gov | ||||||||||
ओहायो (इंग्लिश: Ohio) हे अमेरिकेच्या मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे.
ओहायोच्या उत्तरेला ईरी सरोवर व मिशिगन, पश्चिमेला इंडियाना, दक्षिणेला केंटकी, आग्नेयेला वेस्ट व्हर्जिनिया तर पूर्वेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. कोलंबस ही ओहायोची राजधानी असून सिनसिनाटी व क्लीव्हलंड ही दोन मोठी महानगरे आहेत.
अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील औद्योगिक पट्ट्याचा ओहायो हा एक महत्त्वाचा भाग आहे. मिशिगन मधील वाहन उद्योगासाठी सुटे भाग उत्पादन करणारे अनेक कारखाने ओहायोमध्ये आहेत.
प्रमुख शहरे व लोकसंख्या
- कोलंबस: 787,033
- क्लीव्हलंड: 396,815
- सिनसिनाटी: 296,943
- टॉलिडो: 287,208
- ॲक्रन 199,110
- डेटन: 141,527
गॅलरी
- स्वागत फलक.
ओहायोमधील प्रमुख महामार्ग
ओहायो राज्य संसद भवन
ओहायोचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
- अधिकृत सरकारी संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2013-06-17 at the Wayback Machine.
