ओशिवरा नदी
ओशिवारा नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई शहराच्या उपनगरातील एक नदी आहे. ही नदी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावते आणि अंधेरीच्या औद्योगिक क्षेत्रातून वहात जात वरसोवाजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची लांबी फारच कमी आहे. या नदीवर घोडबंदर रस्त्यावर बांधलेला पूल ’ओशिवारा ब्रिज’ म्हणून ओळखला जातो. हा पूल जोगेश्वरी आणि गोरेगाव या उपनगरांना जोडतो.
ओशिवारा नदीवरून जोगेश्वरीचा भाग असलेल्या एका उपनगराला ओशिवारा म्हणतात. त्या उपनगरात ओशिवारा पोलीस स्टेशन आणि ओशिवारा बस डेपोही आहे.आता तेथे ओशिवारा रेल्वे स्थानकही झाले आहे. या रेल्वे स्थानकाला राम मंदिर असे नाव देण्यात आले आहे.