Jump to content

ओलकतंबोल

ओलकतंबोल (संस्कृत:पिशाचकार्पास, पीवरी; बंगाली: ओलट कंबोल; हिंदी: कुमल,सनुकपाशी; शास्त्रीय नाव: Abroma augusta) हा एक लहान झाळकट वृक्ष आहे. याच्या फांद्या मखमलीसारख्या गुळगुळीत, पानें देठाकडे गोल व खाचायुक्त,दंतयुक्त,खालचे अंग लोमयुक्त खरबरीत; शिरा ५;फुले जांभळी व खाली वाकलेली आणि ती दोन तीन एकत्र येतात . पाकळ्या ५ फळ ५ खोलींचे व पाच पंख असलेले बोंड. बोंड पिकल्यावर डोकीवर उघडते, बिया पुष्कळ व काळ्या मुळ्याच्या बियांएवढ्या. मूळ जाड व चिवट आणि ताजे असताना कापल्यास आंतून जाड गोंद वाहतो. मुळाची साल उदी रंगाची असते, ती जाड असून सहज सुटी होते. मुळांस पुष्कळ उपमुळे फुटतात व ती काढली तरी झाडास इजा होत नाही.

उत्पत्ती - हे झाड उत्तर भारतात होते व थोड्या निगेने सर्वत्र होईल. ह्यापासून उत्तम दोर काढता येतो. औषधात मूळ वापरतात.

रसशास्त्र- मुळाच्या सालींत जाड बोळ आहे. तो पाण्यात मिसळत नाही. सुकलेल्या मुळाच्या सालीचे उष्णतेने ५.५ टक्के वजन कमी होते. सालीची राख ११.५ टक्के पडते. हिच्यांत मेंगेनीझ् नसते.

धर्म- ओलकतंबोल गर्भाशयास उत्तेजक , आर्तवजनन व गर्भाशयाची पीडा कमी करणारे व स्नेहन आहे.

उपयोग- परम्यात ताज्या पानांचा व दांड्याचा हिम फार गुणावह आहे. अभिष्यंद व वातप्रधान पीडितार्तवांत विशेष उपयुक्त आहे. ह्याने आर्तव वाढू लागते व गर्भाशयास बळ येते. आर्तव चालू असताना ताज्या मुळांची साल वाटून बोळ निघतो. तो मिरपुडी बरोबर देतात. हे औषध ऋतु येण्यापूर्वी चार दिवस, ऋतु चालू असताना व नंतर दोन दिवस देण्याचा प्रघात बंगालमधे आहे. गर्भ राहाण्यास ऋतु चालू असाताना देतात.