Jump to content

ओरेसुंड पूल

ओरेसुंड पूल

ओरेसुंड पूल हा (डॅनिश: Øresundsbroen, स्वीडिश: Öresundsbron) डेन्मार्कस्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरू होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.

ओरेसुंड पुलाचे बांधकाम इ.स. १९९५ मध्ये सुरू झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.

गॅलरी

बाह्य दुवे

गुणक: 55°34′31″N 12°49′37″E / 55.57528°N 12.82694°E / 55.57528; 12.82694