ओमर बाँगो
ओमर बॉंगो | |
गॅबनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २ डिसेंबर १९६७ – ८ जून २००९ | |
मागील | लिओन एम्बा |
---|---|
पुढील | अली बॉंगो ओंडिंबा |
जन्म | ३० डिसेंबर १९३५ लेवाई, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका (आजचा गॅबन) |
मृत्यू | ८ जून, २००९ (वय ७३) बार्सिलोना, स्पेन |
धर्म | सुन्नी इस्लाम |
ओमर बॉंगो (इंग्लिश: El Hadj Omar Bongo Ondimba; ३० डिसेंबर १९३५ –८ जून २००९) हा गॅबन देशातील एक राजकारणी व देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ ते मृत्यूपर्यंत २००९ पर्यंत ४१ वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्षपदावर राहणारा बॉंगो जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहे.
गॅबनमधील खनिज तेल व इतर नैसर्गिक संपत्तीमुळे बॉंगोच्या कार्यकाळात गॅबनची भरभराट झाली परंतु त्यामधील मोजकाच निधी जनतेपर्यंत पोचला. बॉंगो व त्याच्या कुटुंबियांनी कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचे आरोप त्याच्यावर झाले होते. बॉंगोचे फ्रान्ससोबत विशेष जवळीकीचे संबंध होते.
८ जून २००९ रोजी बार्सिलोना येथे बॉंगोचे कर्करोगाने निधन झाले. त्याचा मुलगा अली बॉंगो ओंडिंबा हा गॅबनचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत