ओम शांती ओम
ओम शांती ओम | |
---|---|
दिग्दर्शन | फराह खान |
निर्मिती | गौरी खान |
प्रमुख कलाकार | शाहरुख खान दीपिका पडुकोण अर्जुन रामपाल श्रेयस तळपदे किरण खेर नितेश पांडे जावेद शेख आसावरी जोशी |
संगीत | विशाल-शेखर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ नोव्हेंबर २००७ (भारत) |
अवधी | १७० मिनिटे |
ओम शांती ओम हा २००७ भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे. फराह खान ने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे व किरण खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान व दीपिका पडुकोण ह्यांनी नंतर चेन्नई एक्सप्रेस (२०१३) व हॅपी न्यू इयर (२०१४) चित्रपटांमध्ये ही एकत्र काम केलं आहे.
कथानक
ओम मखीजा (शाहरुख खान) एक गरीब ज्युनिअर आर्टिस्ट असतो जो गुप्तपणे लग्न झालेली लोकप्रिय अभिनेत्री शांती कश्यप (दीपिका पदुकोण) हिच्या प्रेमात पडतो. तथापि, तिच्या नवरा मुकेश मेहरा (अर्जुन रामपाल) जो एक निर्माता असतो, तिच्या विश्वासघात करतो व तिला आगीत संपवतो. ओम तिला वाचण्याचा प्रयत्न करताना खुप जखमी होतो व तो ही प्राण सोडतो. तीस वर्षांनंतर, तो सुपरस्टार ओम कपूर म्हणुन पुनर्जन्म घेतो व शांती सारखी दिसणारी मुलगी सॅडी बंसल हिच्यासोबत मुकेश कडुन बदला घ्यायचा ठरवतो.
कलाकार
- शाहरुख खान - ओम प्रकाश मखीजा ऊर्फ ओम / ओम कपूर
- दीपिका पडुकोण - शांतीप्रिया कश्यप ऊर्फ शांती / संध्या बंसल
- अर्जुन रामपाल - मुकेश मेहरा
- श्रेयस तळपदे - पप्पु मास्टर
- किरण खेर - बेला मखीजा
- नितेश पांडे - अन्वर शेख
- जावेद शेख - राजेश कपूर
- आसावरी जोशी - लवली कपूर
- युवीका चौधरी - डॉली अरोरा
- बिंदू - कामिनी अरोरा
- नासीर अब्दुल्ला - नासीर
- अमिताभ बच्चन
- ऋषी कपूर
- सुभाष घई
- हृतिक रोशन
- राकेश रोशन
- रेखा
- प्रियांका चोप्रा
- प्रिती झिंटा
- काजोल
- धर्मेंद्र
- सलमान खान
- संजय दत्त
- राणी मुखर्जी
- ऊर्मिला मातोंडकर
- अभिषेक बच्चन
- अक्षय कुमार
- शिल्पा शेट्टी
- शबाना आझमी
- सैफ अली खान
- बिपाशा बासू
- सुरेश चटवाल
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ओम शांती ओम चे पान (इंग्लिश मजकूर)
- संकेतस्थळ