Jump to content

ओबेरॉय ग्रँड (कोलकाता)

ग्रँड हॉटेल तथा ओबेरॉय ग्रँड भारताच्या कलकत्ता शहरातील मध्यवर्ती भागात जवाहर नेहरू रोड (चौरिंगी रोड) वर आहे. ब्रिटिश शासनाच्या कालावधीत बांधकाम झालेली ही अतिशय शोभिवंत देखणी वास्तू आहे. याची मालकी ओबेरॉय संघटित हॉटेलची आहे.

इतिहास

१९व्या शतकात हे हॉटेल कर्नल ग्रँड यांच्या चौरिंगी मार्गावरील खाजगी निवासात सुरू झाले. त्याचा पत्ता १३ चौरिंगी रोड असा होता. नंतर मिसेस ॲनी मॉक यांनी त्याचे वसतिग्रहात रूपांतर केले. १४, १५, व १६ नंबरची घरेही या निवासाला जोडली. १६ नंबरच्या भूखंडावर अरथून स्टीफन या अमेरिकन माणसाच्या मालकीचे एक चित्रपटगृह होते. सन १९११ मध्ये ते चित्रपटगृह जळाले. मग मिसेस मॉक यांनी ती जागाही विकत घेतली आणि या सर्व भूखंडांवर मिळून सध्याचे आलेशान ग्रँड हॉटेल बांधले. []

मिसेस ॲनी मॉक यांनी या हॉटेलच्या बांधकामावर खूप पैसे खर्च करून ते अगदी नवीन शैलीचे केले. थोड्याच दिवसात हे हॉटेल कलकत्ता शहरातील इंग्लिश नागरिकांत लोकप्रिय झाले. नवीन वर्षारंभाच्या समारंभात हजर राहणाऱ्या ग्राहकांना विशिष्ट असी थंडगार शॅंपेन आणि उच्च प्रतीच्या भेट वस्तू दिल्या जाऊ लागल्या. त्या दिवशी डझनभर मोठी डुकरे मोकळी सोडायची, आणि जो कोणी त्यातल्या एखाद्याला पकडेल त्याचे ते झाले, असे कार्यक्रम होऊ लागले. []

सन १९३०मध्ये कलकत्ता शहरातये टायफॉइड रोगाची मोठी साथ आली आणि त्याचा परिणाम या हॉटेलमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला. ड्रेनेज सिस्टिमबद्दल संशय निर्माण झाला आणि हॉटेल सन १९३७मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर मोमन सिंग ओबेरॉय यांनी ही मालमत्ता भाडे तत्त्वावर ताब्यात घेतली आणि सन १९३९मध्ये हॉटेल पुन्हा सुरू केले. सन १९४३ साली ही मालमत्ता त्यांनी खरेदी केली. [][]

दुसऱ्या जागतिक महायुद्धात ४००० सैनिक या हॉटेलात तळ ठोकून राहिले आणि वारंवार पार्टी, समारंभ होऊ लागले. त्याने या हॉटेलच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली आणि त्याचे चित्रच पालटले. अमेरिकन नौसैनिक देखील येथल्या युगुलनृत्याच्या कार्यक्रमांना वारंवार हजेरी लावू लागले.

हॉटेलचे स्वरूप

हे हॉटेल म्हणजे विशाल असी शुभ्र रंगाची इमारत आहे. वरच्या मजल्यावर ऐसपैस व्हरांडा, बाल्कनी, असून हरएक गोष्ट नियोजनबद्ध आहे. प्रत्येक ब्लॉकला स्तंभांनी उचलून धरले आहे.

पुरस्कार

  • सन २००५मध्ये झालेल्या जागतिक सर्वेक्षणानंतर या हॉटेलला ’टॉप इंटरनॅशनल हॉटेल अँड रिझॉर्ट इन इंडिया’ हा पुरस्कार मिळाला.
  • बेस्ट बिझिनेस हॉटेल इन एशिया अँड CNBC या पुरस्कारासाठी नामनिर्देशन झाले.: []
  • पश्चिम बंगाल सरकारच्या पर्यटन खात्याने या हॉटेलला ’बेस्ट हॉटेल इन द फाइव्ह स्टार डीलक्स कॅटेगरी इन पूर्व भारत’, असे ठरवले... .

संदर्भ

  1. ^ a b c "ग्रॅंड हॉटेल्स वास्तव आणि मोहजाल" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "ओबेरॉय ग्रॅंड बद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ओबेरॉय हॉटेल्स ला मिळालेले पुरस्कार" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)