Jump to content

ओब नदी

ओब
Обь
बर्नाउलजवळ ओबचे पात्र
ओब नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम बेलुखा पर्वत, आल्ताय प्रजासत्ताक, रशिया
मुखकारा समुद्र, आर्क्टिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देशरशिया
लांबी ३,६५० किमी (२,२७० मैल)
उगम स्थान उंची २,३०० मी (७,५०० फूट)
सरासरी प्रवाह १२,४७५ घन मी/से (४,४०,६०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २९,७२,४९७

ओब (रशियन: Обь) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: लेनायेनिसे). रशियाच्या दक्षिण भागातील आल्ताय क्रायमधील बियिस्क शहराजवळ बिया व कातुन ह्या दोन नद्यांच्या संगमामधून ओबची सुरुवात होते. ह्या दोन्ही नद्या आल्ताय पर्वतरांगेमध्ये उगम पावतात. रशियाच्या उत्तर भागात ओबला इर्तिश ही दुसरी मोठी नदी मिळते. ओब व इर्तिश नद्यांची एकत्रित लांबी ५,४१० किमी इतकी आहे.

ओब नदी रशियाच्या आल्ताय क्राय, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त, तोम्स्क ओब्लास्त, खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगयमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग ह्या राजकीय विभागांमधून वाहते व बर्नाउल, नोव्होसिबिर्स्क, खान्ती-मान्सीस्क ही मोठी शहरे ओबच्या काठावर वसली आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत