Jump to content

ओनोन नदी

ओनोन (मंगोलियन: Онон гол, रशियन: Оно́н) ही रशिया आणि मंगोलियामधून वाहणारी एक नदी आहे. ४१८ किमी लांबीची ही नदी मंगोलियामध्ये उगम पावते व रशियाच्या झबायकल्स्की क्रायमध्ये शिल्का नदीला मिळते. शिल्का ही आमूर नदीची एक उपनदी आहे.

ओनोन नदीच्या परिसरात चंगीझ खानचा जन्म झाला.