ओठ
मानवांच्या व अन्य अनेक प्राण्यांच्या नाक आणि हनुवटी यांमधील मऊ, चल भागास ओठ (अनेकवचन: ओठ ; इंग्लिश: Lip, लिप) असे म्हणतात. अन्नाचा घास तोंडी घेण्यासाठी, आवाज (ध्वनी) काढण्यासाठी व शब्दध्वनी उच्चारण्यासाठी ओठांचा उपयोग होतो. मानवी ओठ संवेदनशील अवयव असून चुंबन किंवा प्रणयाच्या अन्य क्रियांमध्ये कामोद्भवक अवयव म्हणूनही भूमिका बजावतात.