ओग्लाला
ओग्लाला किंवा ओग्लाला सू ही अमेरिकेतील लाकोटा जमातीच्या सात उपजमातींपैक एक आहे. मूळचे अमेरिकन असलेले ओग्लाला लोक ओग्लाला लाकोटा नावानेही ओळखले जातात.
ओग्लाला लोकांमधील मौखिक इतिहासानुसार ही जमात लाकोटांमधील इतर जमातींपासून अंदाजे अठराव्या शतकात वेगळी झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपीय आगंतुक लाकोटा प्रदेशात येउ लागले. प्राण्यांची कातडी व केस यांच्या मागे आलेल्या या लोकांशी संपर्क आल्यावर लाकोटा लोकांची जीवनशैली बदलली. १८६८ च्या फोर्ट लारामीच्या तहानुसार अमेरिकेने पारंपारिकरीत्या ओग्लाला व इतर लाकोटांची जवळजवळ जमीन गिळंकृत केली.[१] यावेळी ओग्लालांच्या काही गटांनी अमेरिकन सरकारकडून अन्न आणि इतर मदत घेतली व देऊ केलेल्या तुटपुंज्या जमिनीवर स्थलांतर केले. इतर गटांनी अमेरिकन सरकारला सशस्त्र विरोध केला आणि आपली भटकी जीवनशैली चालू ठेवली.
थासुंके विट्को (क्रेझी हॉर्स), वसिकुन थासुंके (धाकटा अमेरिकन हॉर्स), माहपिया लुटा (रेड क्लाउड) हे ओग्लालांपैकी काही प्रमुख नेते होते.