Jump to content

ओक्राम इबोबी सिंह

ओक्राम इबोबी सिंग

कार्यकाळ
७ मार्च २००२ – १५ मार्च २०१७
मागील राधाबिनोद कोईजाम
पुढील एन. बीरेन सिंह

जन्म १९ जून, १९४८ (1948-06-19) (वय: ७६)
मणिपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी लांधोनी देवी

ओक्राम इबोबी सिंग ( १९ जून १९४८) हे भारताच्या मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री व मणिपूर विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले होते. त्यांच्या पत्नी लांधोनी देवी ह्या देखील मणिपूर विधानसभेमध्ये आमदार आहेत. २०१७ मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ६० पैकी २१ जागांवर विजय मिळवला व इतर काही पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. मणिपूरमध्ये भाजपचे हे पहिलेच सरकार आहे. एन. बीरेन सिंह हे मुख्यमंत्री बनले.

बाह्य दुवे