ओकीगहारा
Aokigahara 青木ヶ原 (Japanese) | |
---|---|
Aokigahara, Misaka Mountains and Saiko Lake seen from Mount Ryu of Tenshi Mountains | |
साचा:Superimpose2 Location of Aokigahara and Mount Fuji | |
पर्यावरणशास्त्र | |
प्राणिक्षेत्र | Palearctic |
बायोम | Temperate broadleaf and mixed forest |
भूगोल | |
क्षेत्र | ३५ चौ. किमी (१४ चौ. मैल) |
देश | Japan |
Prefecture | Yamanashi Prefecture |
समन्वयक | 35°28′12″N 138°37′11″E / 35.47000°N 138.61972°Eगुणक: 35°28′12″N 138°37′11″E / 35.47000°N 138.61972°E |
Conservation | |
Conservation status | Relatively stable/Relatively intact |
ओकीगहारा (जपानी नाव: 青木ヶ原) चा अर्थ झाडांचा समुद्र (樹海, Jukai) असाही होतो. हे जंगल जपानमधील फुजी पर्वताच्या उत्तर-पश्चिम दिशेला आहे. याचे क्षेत्रफळ ३० चौरस किमी (१२ चौ. मैल) आहे. हे जंगल इ.स. ८६४ साली झालेल्या माउंट फुजीच्या शेवटच्या ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या आणि सध्या थंड झालेल्या शिलारसावर बनलेले आहे [१] . ओकीगहाराच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक लेण्या आहेत, ज्या हिवाळ्यामध्ये बर्फाने भरलेल्या असतात. यामुळे पर्यटकांसाठी आणि शाळेच्या सहलीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. ओकीगहाराचे काही भाग फारच दाट झाडींचे आहेत. सच्छिद्र लावा वातावरणातील आवाज शोषून घेतो आणि अभ्यागतांना एकांतपणाची भावना प्रदान करतो.[२]
जपानी पौराणिक कथांमधील मृतांचे भूत म्हणजेच यरीचे घर म्हणून या जंगलाची ऐतिहासिक प्रतिष्ठा आहे. अलिकडच्या वर्षांत, ओकीगहारा जंगल "सुसाइड फॉरेस्ट" म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जगातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेंपैकी ही एक जागा आहे. या जंगलातीला काही पायवाटांच्या सुरुवातीला काही चिन्हे लावली आहेत, ती चिन्हे आत्महत्याग्रस्त अभ्यागतांना त्यांच्या कुटुंबियांचा विचार करण्यास आणि आत्महत्या रोखणाऱ्या संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करतात.
भूगोल
जंगलाची जमीन मुख्यत्वे ज्वालामुखीच्या खडकांपासून बनलेली आहे. यामुळे येथे खोदकाम करणे मुश्किल आहे. जंगल खूपच दाट असल्याने अलीकडच्या काही वर्षात, ओकीगहारामार्गे प्रवास करणारे हायकर्स आणि पर्यटकांनी रस्ता लक्षात ठेवता यावा म्हणून प्लास्टिकच्या टेपचा वापर खुणेसाठी करण्यास सुरुवात केली आहे.[३] नरुसावा आईस गुहा, फुगाकू विंड गुहा आणि लेक साई बॅट गुहा अशा अनेक गुहा पर्यटकांसाठी आकर्षणे ठरतात. ह्या माउंट फुजीजवळील तीन मोठ्या लाव्हापासून बनलेल्या गुहा आहेत. यापैकी नरुसावा आईस गुहा वर्षभर गोठलेली असते.[४]
माध्यमांमधील संदर्भ
ओकीगहाराचा उल्लेख अनेक मीडिया माध्यमात केला गेला आहे. उदाहरणार्थ: मध्ये केला गेला आहे ॲनिमे, मॅंगा, चित्रपट, साहित्य, संगीत, आणि व्हिडिओ गेम सारख्या अनेक ठिकाणी याचा वापर आहे.
बीबीसी रेडिओ ४ मध्ये एक कार्यक्रम याचे विषयावर होता. तो प्रथम १० सप्टेंबर २०१८ तोजी प्रसारित झाला होता. ज्यात जंगलात कविता लिहिण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी चार कवींनी ओकीगहारा येथे प्रवास केला.[५]
अरई टाकाको, जॉर्डन ए.वाय. स्मिथ, ओसाकी सयाका आणि योत्सुमोतो यासुहिरो या कविंनी ‘सी ऑऑफ ट्रीज ’ या कवितेच्या पुस्तका द्वारे ‘ओकीगाहारा’ विषयावर द्वैभाषिक (जपानी / इंग्रजी) सहलेखन केले आहे .[६]
जपानी वंशाच्या अमेरिकन नाटककार क्रिस्टीन हारुना ली यांनी मार्च २०१९ मध्ये न्यू यॉर्क शहरातील ' सुसाइड फॉरेस्ट' नाटक लिहिले . यात त्यांनी अमेरिका आणि जपानमधील आत्महत्येसंबधित विषयावर भाष्य केले.[७]
२०१५ मधील सी ऑफ ट्रीज या चित्रपटामध्ये या जंगलात घडणारी एक कहाणी देखील सांगण्यात आली आहे.या चित्रपटात मॅथ्यू मॅककोनाघे, केन वतानाबे आणि नाओमी वॅट्स यांनी काम केले आहे.
रॅप कलेक्टिव ओओकी बॉईजज हे नाव ओकीगहारा वरून घेलेत आहे.
संदर्भ
- ^ "The nature found in the Aokigahara 'sea of trees'". Yamanashi Kankou. 21 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Harrington, Patrick (22 January 2017). "Hiking in a Forest Born Out of Mount Fuji's Lava". न्यू यॉर्क टाइम्स. p. TR8.
- ^ "Intruders tangle 'suicide forest' with tape". Asahi Svhimbun. 3 May 2008. 6 May 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2008 रोजी पाहिले.
- ^ "About Narusawa lce Cave/Fugaku Wind Cave - Mount Fuji Travel Guide". Planetyze (इंग्रजी भाषेत). 13 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "The Art of Now: Atmosfears". Art of Now. BBC Radio 4. 4 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Excursions 2: Sea of Trees". Tokyo Poetry Journal. ToPoJo Excursions. 4 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Collins-Hughes, Laura (4 March 2019). "A Family Divide Haunts Heart-Rending 'Suicide Forest'". The New York Times. 7 March 2019 रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- ओकीगहारा वन माहिती
- यूट्यूब वरची Suicide Forest in Japan (May 2012) ( Vice.com )
- "鳴沢氷穴" [Narusawa Hyoketsu Ice Cave]. Mt Fuji Cave. (in English)
- "富岳風穴" [Fugaku Fuketsu Wind Cave]. Mt Fuji Cave. (in English)