ओंकार महादेव वर्तले
ओंकार महादेव वर्तले हे मराठी लेखक, हौशी पर्यटक, व्याख्याते असून मराठीतील अनेक पर्यटनविषयक पुस्तकांचे ते लेखक आहेत.
ओंकार वर्तले | |
---|---|
जन्म नाव | ओंकार महादेव वर्तले |
शिक्षण | बी.ई. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पर्यटन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवास वर्णन |
विषय | किल्ले, गिर्यारोहण, पर्यटन स्थळे |
वडील | महादेव वर्तले |
आई | सुरेखा वर्तले |
पत्नी | माधुरी वर्तले |
शैक्षणिक, साहित्यिक कार्य
ओंकार वर्तले[१] यांनी पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन येथून पदविका, तर पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथून विद्युत अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
सध्या ते महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीत अभियंता या पदावर कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील गडकिल्ले, पर्यटन स्थळे त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहिली असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांनाही त्यांनी भेटी देऊन त्यांवर अनेक व्याख्याने, लेख आणि पुस्तके प्रकाशित केली आहेत.
या व्यतिरिक्त त्यांनी पर्यटन या विषयावर महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, प्रहार, प्रभात या नामांकित वृत्तपत्रांत स्तंभलेखक म्हणून विस्तृत लिखाण केले आहे.
तसेच लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ या मासिकांमध्ये त्यांनी लिखाण केले आहे.
आतापर्यंत त्यांनी एकूण बारा पुस्तके लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
वृत्तपत्रीय लिखाण
- दैनिक प्रहार (मुंबई आवृत्ती) यामध्ये भटकंतीवर 'भन्नाट' या सदरामध्ये लिखाण.
- दैनिक लोकमत (ठाणे आवृत्ती) मध्ये भटकंतीवर लिखाण.
- साप्ताहिक सकाळमध्ये 'पर्यटन' या विषयावर लिखाण.
- दैनिक लोकसत्तामध्ये 'लोकभ्रमंती'मध्ये लिखाण.
- दैनिक प्रभात (पुणे आवृत्ती) मध्ये भटकंतीवर स्तंभलेखन.
- लोकप्रभा या साप्ताहिकात 'ट्रेकर्स ब्लॉगर' या विषयावर लिखाण.
ओंकार वर्तले यांची प्रकाशित पुस्तके
1. आडवाटेवरील ठिकाणांचा समावेश असलेले, 'सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती[२]'.
2. सहकुटुंब फिरण्यासाठीची ठिकाणे असलेले, 'आडवाटेवरची भटकंती[३]'
3. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांची ओळख करून देणारे, 'मंदिरांच्या देशा[४]'.
4. ऐतिहासिक अशा मावळ तालुक्याची माहिती करून देणारे, 'सफर मावळची[५]'.
5. कौटुंबिक भटकंतीसाठी महाराष्ट्रातील ठिकाणांचे, 'प्रेक्षणीय महाराष्ट्राची भटकंती[६]'.
6. आपल्या संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या लेण्या, 'महाराष्ट्रातील प्राचीन लेणी[७]'.
7. पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा भोर तालुक्यावर, 'सफर निसर्गरम्य भोरची[८]'.
8. भारताचे नंदनवन असलेल्या भागावर, 'लेह-लडाख'.
9. सत्यकथेवर आणि कष्टकरी विद्यार्थ्याच्या संघर्षावर आधारित, 'गोष्ट यशस्वी अभिमन्यूची[९]'.
10. हिमाचलमधील ऑफबीट ठिकाणावर, 'हिमाचल स्पिती-पिन-सांगला'.
11. भारतातील अत्यंत पवित्र नदी संदर्भातील, 'उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आणि दत्तस्थाने[१०]'.
12. शौर्याची गाथा सांगणारी एक सुंदर कादंबरी 'एक झुंज वाघाशी[११]'.
बालसाहित्य
1. लहान मुलांसाठी उपयुक्त असलेले, 'बालकुमारासांठी गड-किल्ले'.
संदर्भ
- ^ "मावळ". विकिपीडिया. 2023-04-16.
- ^ "सह्याद्री". विकिपीडिया. 2024-07-08.
- ^ वर्तले ओंकार (2018). आडवाटेवरची भटकंती (१ली ed.). पुणे: नावीन्य प्रकाशन. ISBN 978-81-936564-3-3.
- ^ "Subject Heading | Research Catalog | NYPL". Subject Heading | Research Catalog | NYPL (इंग्रजी भाषेत). 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ "मावळ". विकिपीडिया. 2023-04-16.
- ^ "SaVaK.in - सार्वजनिक वाचनालय कल्याण". www.savak.in. 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ "SaVaK.in - सार्वजनिक वाचनालय कल्याण". www.savak.in. 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ "SaVaK.in - सार्वजनिक वाचनालय कल्याण". www.savak.in. 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ saptrang@esakal.com, प्रतिनिधी (2023-05-14). "दारिद्र्याला नमवलं कष्ट आणि बुद्धीनं". Marathi News Esakal. 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ "Lokmat ePaper: Marathi News Paper | Online English, Hindi & Marathi Paper | Daily News ePaper| Today's News Papers | लोकमत वृत्तपत्रे". epaper.lokmat.com. 2024-09-05 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, प्रभात (2024-08-13). [https://www.dainikprabhat.com/talegaon-tradition-of-excellent-writers-dr-shripal-sabnis/ "पिंपरी | तळेगावला उत्कृष्ट लेखकांची परंपरा – ड�"]. Dainik Prabhat. 2024-09-05 रोजी पाहिले. replacement character in
|title=
at position 47 (सहाय्य)