Jump to content

ओ. पन्नीरसेल्वम

ओ. पन्नीरसेल्वम

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री
कार्यकाळ
21 ऑगस्ट 2017 – 06 मे 2021

कार्यकाळ
६ डिसेंबर २०१६ – १६ फेब्रुवारी २०१७
मागील जयललिता
पुढील के. पळणीस्वामी
कार्यकाळ
२९ सप्टेंबर २०१४ – २२ मे २०१५
मागील जयललिता
पुढील जयललिता
कार्यकाळ
२१ सप्टेंबर २००१ – १ मार्च २००२
मागील जयललिता
पुढील जयललिता

जन्म जानेवारी १९५१
पेरियाकुलम, तेनी जिल्हा, तामिळ नाडू
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम

तिरू ओ. पन्नीरसेल्वम (तामिळ: ஓ. பன்னீர்செல்வம்; जानेवारी १९५१) हे भारताच्या तामिळ नाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. अण्णा द्रमुकच्या पक्षनेत्या जयललिता ह्यांच्या मृत्यूंतर त्यांनी ५ डिसेंबर २०१६ रोजी पदभार स्वीकारला. ह्यापूर्वी देखील ते दोन वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर होते. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते के. पळणीस्वामी ह्यांची नेतेपदावर निवड करण्यात आली व १८ फेब्रुवारी २०१७ रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून पळणीस्वामी ह्यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला.

अण्णा द्रमुक पक्षाचे नेते असलेले पन्नीरसेल्वम पक्षाध्यक्ष जयललिता ह्यांचे कट्टर समर्थक मानले जातात.त्यांनी सुचवले होते व्ही के शशिकला २७ सप्टेंबर २०१४ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जयललिता ह्यांना दोषी ठरवून त्यांना चार वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. ह्या निर्णयानंतर जयललितांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले व त्यांनी पन्नीरसेल्वम ह्यांना मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची सूचना केली होती. त्यानुसार तामिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत रविवारी पन्नीरसेल्वम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. २९ सप्टेंबर २०१४ रोजी पन्नीरसेल्वमनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.[] जयललितांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आल्या. २०१६ विधानसभा निवडणूकीत अण्णा द्रमुकने बहुमत राखले. परंतु डिसेंबर २०१६ मध्ये जयललितांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा पन्नीरसेल्वम ह्यांच्यावर आली.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम यांचा शपथविधी".