ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२ | |||||
श्रीलंका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ७ जून – १२ जुलै २०२२ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने (कसोटी) दासून शनाका (ट्वेंटी२०) | पॅट कमिन्स (कसोटी) ॲरन फिंच (ए.दि., ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | दिनेश चंदिमल (२१९) | स्टीव्ह स्मिथ (१५१) | |||
सर्वाधिक बळी | प्रभात जयसुर्या (१२) | नॅथन ल्यॉन (११) | |||
मालिकावीर | दिनेश चंदिमल (श्रीलंका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कुशल मेंडिस (२४९) | ग्लेन मॅक्सवेल (१६०) | |||
सर्वाधिक बळी | दुनिथ वेल्लालागे (९) | पॅट कमिन्स (८) | |||
मालिकावीर | कुशल मेंडिस (श्रीलंका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चरिथ असलंका (१०३) | डेव्हिड वॉर्नर (१३०) | |||
सर्वाधिक बळी | वनिंदु हसरंगा (५) | जॉश हेझलवूड (६) | |||
मालिकावीर | ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने, पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. मार्च २०२२ मध्ये दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. वरिष्ठ संघाबरोबरच ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने देखील श्रीलंकेचा दौरा केला.
ऑस्ट्रेलियाने पहिले दोन ट्वेंटी२० सामने जिंकत मालिका जिंकली. श्रीलंकेने तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात कर्णधार दासून शनाकाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ गडी राखून विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाने पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. श्रीलंकेने पुढचे तीन वनडे जिंकत १९९२ नंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने पाचवा सामना ४ गडी राखून जिंकला. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी जिंकली. श्रीलंकेने दुसरी कसोटी १ डाव आणि ३९ धावांनी जिंकली आणि कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दिनेश चंदिमल याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले द्विशतक झळकावले तर १२/११७ ही प्रभात जयसुर्याने श्रीलंकेतर्फे पदार्पणात केलेली सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरली.
सराव सामने
लिस्ट-अ सामना:श्रीलंका अ वि. ऑस्ट्रेलिया अ
लिस्ट-अ सामना:श्रीलंका अ वि. ऑस्ट्रेलिया अ
वि | ||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया अ, फलंदाजी.
प्रथम-श्रेणी सामना:श्रीलंका अ वि. ऑस्ट्रेलिया अ
प्रथम-श्रेणी सामना:श्रीलंका अ वि. ऑस्ट्रेलिया अ
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
श्रीलंका १२८ (१९.३ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १३४/० (१४ षटके) |
डेव्हिड वॉर्नर ७०* (४४) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
श्रीलंका १२४/९ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १२६/७ (१७.५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया १७६/५ (२० षटके) | वि | श्रीलंका १७७/६ (१९.५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
श्रीलंका ३००/७ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २८२/८ (४२.३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे ऑस्ट्रेलियाला ४४ षटकांमध्ये २८२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- दुनिथ वेल्लालागे (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
श्रीलंका २२०/९ (४७.४ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १८९ (३७.१ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे ऑस्ट्रेलियाला ४३ षटकांमध्ये २१६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- मॅथ्यू कुन्हेमन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
ऑस्ट्रेलिया २९१/६ (५० षटके) | वि | श्रीलंका २९२/४ (४८.३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४था सामना
श्रीलंका २५८ (४९ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २५४ (५० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
श्रीलंका १६० (४३.१ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १६४/६ (३९.३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- प्रमोद मदुशन (श्री) आणि जॉश इंग्लिस (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
श्रीलंका | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- जेफ्री व्हँडर्से (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - १२, श्रीलंका - ०.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- प्रभात जयसुर्या, महीश थीकशाना आणि कमिंदु मेंडिस (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - १२, ऑस्ट्रेलिया - ०.