ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २४ फेब्रुवारी – १३ मार्च २०१९ | ||||
संघनायक | विराट कोहली | ॲरन फिंच | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लोकेश राहुल (९७) | ग्लेन मॅक्सवेल (१६९) | |||
सर्वाधिक बळी | जसप्रीत बुमराह (३) | नॅथन कौल्टर-नाईल (४) | |||
मालिकावीर | ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले.[४] ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.[५]
संघ
एकदिवसीय | ट्वेंटी२० | ||
---|---|---|---|
भारत[६] | ऑस्ट्रेलिया[७] | भारत[६] | ऑस्ट्रेलिया[७] |
|
|
|
|
शॉन मार्श ऑस्ट्रेलिया संघाला तिसऱ्या सामन्यापुर्वी येऊन मिळेल अश्या रितीने त्याची निवड करण्यात आली. डार्सी शॉर्टला पुरवठा म्हणून घेण्यात आले.[७] सिद्धार्थ कौलला पहिल्या दोनच एकदिवसीय सामन्यासाठी घेतलं गेलं तर उर्वरीत सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले.[६] दौऱ्यापुर्वी दुखापत झाल्यामुळे हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडला तर त्याच्याजागी एकदिवसीय संघात रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली,[८] ट्वेंटी२० संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.[९] तर ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी अँड्रु टायची निवड करण्यात आली.[१०]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
भारत १२६/७ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १२७/७ (२० षटके) |
लोकेश राहुल ५० (३६) नॅथन कौल्टर-नाईल ३/२६ (३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- मयंक मार्कंडे (भा) आणि पीटर हॅंड्सकोंब (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- जसप्रीत बुमराह (भा) ट्वेंटी२०त ५० बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
२रा सामना
भारत १९०/४ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९४/३ (१९.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- ग्लेन मॅक्सवेल (ऑ) ट्वेंटी२०त तीन शतके ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला.
- भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
ऑस्ट्रेलिया २३६/७ (५० षटके) | वि | भारत २४०/४ (४८.२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ॲश्टन टर्नर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ॲरन फिंचचा (ऑ) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
२रा सामना
भारत २५० (४८.२ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २४२ (४९.३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- रवींद्र जडेजा (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये २००० धावा आणि १५०+ बळी घेणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला.
- विराट कोहली (भा) सचिन तेंडूलकरनंतर ४० एकदिवसीय शतके ठोकणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.
- विराट कोहली (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कमी डावात ९,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.
- भारताचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
३रा सामना
४था सामना
५वा सामना
संदर्भ
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).
- ^ "हिंदुस्थानने विश्वचषकासाठी कमर कसली, २०१८-१९च्या मोसमात भारत खेळणार तब्बल ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने".
- ^ "भारताची पहिली दिवस-रात्र कसोटी कदाचित राजकोट किंवा हैदराबाद येथे खेळवली जाईल".
- ^ "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा बंगळुरूतून सुरू".
- ^ "मॅक्सवेलचा तडाखा, भारत पराभूत".
- ^ a b c "बीसीसीआयतर्फे ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ जाहीर".[permanent dead link]
- ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय व ट्वेंटी२० संघ जाहीर, विश्वचषकाची जय्यत तयारी".
- ^ "हार्दिक पंड्या बाहेर".
- ^ "ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतून पंड्या बाहेर".
- ^ "रिचर्डसनच्या जागी टाय भारतात दाखल".