ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २०१६-१७ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३० सप्टेंबर २०१६ – १२ ऑक्टोबर २०१६ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी | स्टीव्ह स्मिथ | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रायली रॉसू (३११) | डेव्हिड वॉर्नर (३८६) | |||
सर्वाधिक बळी | ॲंडिल फेहलुक्वायो (८) | ख्रिस ट्रेमेन (७) | |||
मालिकावीर | रायली रॉसू (द) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेला. त्याशिवाय आयर्लंडविरुद्ध एक एकदिवसीय सामना खेळवला गेला.[१]
दक्षिण आफ्रिकेने मालिका ५-० ने जिंकली. ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्वच्या सर्व ५ सामन्यांमध्ये पराभूत होण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.[२]
संघ
दक्षिण आफ्रिका[३] | ऑस्ट्रेलिया[४] |
---|---|
|
|
- दुखापतीमुळे जेम्स फॉकनर आणि शॉन मार्शला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. मार्श ऐवजी उस्मान ख्वाजाला संघात नियुक्त केले गेले, तर फॉकनरऐवजी कुणालाही संघात घेतले गेले नाही.[५]
- गुडघ्याच्या दुखापतीमुळे ख्रिस मॉरिसला २ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर जावे लागले. त्याच्याऐवजी ड्वेन प्रिटोरियसची निवड करण्यात आली.[६]
- कोपराला झालेल्या इजेमुळे ए.बी. डी व्हिलियर्सच्या ऐवजी रायली रॉसूची संघात निवड करण्यात आली. त्याशिवाय आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही त्याला माघार घ्यावी लागली.[७]
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे वेन पार्नेल उर्वरीत मालिकेतून बाहेर.[८]
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका
१ला सामना
ऑस्ट्रेलिया २९४/९ (षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २९५/४ (३६.२ षटके) |
जॉर्ज बेली ७४ (९०) ॲंडिल फेहलुक्वायो ४/४४ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- क्विंटन डी कॉकच्या १७८ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक तसेच कोणत्याही फलंदाजातर्फे दक्षिण आफ्रिकेमधील सर्वोत्तम धावसंख्या.[९]
२रा सामना
दक्षिण आफ्रिका ३६१/६ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २१९ (३७.४ षटके) |
ट्रेव्हिस हेड ५१ (४५) वेन पार्नेल ३/४० (७ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: जो मेनी आणि ख्रिस ट्रेमेन (दोघे ऑस्ट्रेलिया)
३रा सामना
ऑस्ट्रेलिया ३७१/६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ३७२/६ (४९.२ षटके) |
डेव्हिड वॉर्नर ११७ (१०७) इम्रान ताहिर २/५४ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- एकदिवसीय क्रिकेटमधील हा दुसरा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग आहे.[१०]
४था सामना
ऑस्ट्रेलिया १६७ (३६.४ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १६८/४ (३५.५ षटके) |
फाफ डू प्लेसी ६९ (८७) ख्रिस ट्रेमेन २/४८ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
५वा सामना
दक्षिण आफ्रिका ३२७/८ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २९६ (४८.२ षटके) |
रायली रॉसू १२२ (११८) जो मेनी ३/४९ (१० षटके) | डेव्हिड वॉर्नर १७३ (१३६) इम्रान ताहिर २/४२ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना
संदर्भ आणि नोंदी
- ^ "दक्षिण आफ्रिका पुढील मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा दुर्दैवी व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी फेहलुक्वायोची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त शॉन मार्श आणि फॉकनर दक्षिण आफ्रिका दौर्यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे मॉरिस दोन महिने संघाबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ए.बी. डी व्हिलियर्स ऑस्ट्रेलिया दौर्यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बरगड्यांच्या दुखापतीमुळे पार्नेल मालिकेबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डी कॉकचा आकर्षक घणाघाती हल्ला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.