ऑस्कर (फुटबॉल खेळाडू)
ऑस्कार दोस सान्तोस एम्बोआबा हुनियोर उर्फ ऑस्कार (पोर्तुगीज: Oscar dos Santos Emboaba Júnior; ९ सप्टेंबर १९९१ ) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २०११ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ऑस्कार २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर ऑस्कार २००८-१० दरम्यान ब्राझीलमधील साओ पाउलो एफ.सी., २०१०-१२ दरम्यान स्पोर्ट क्लब इंटरनासियोनाल तर २०१२ पासून प्रीमियर लीगमधील चेल्सी एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.