ऑलिंपिया
ऑलिंपिया Ολυμπία | |
ग्रीसमधील शहर | |
ऑलिंपिया | |
देश | ग्रीस |
क्षेत्रफळ | ५४४.९ चौ. किमी (२१०.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २०७ फूट (६३ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १९,८७५ |
- घनता | ३६ /चौ. किमी (९३ /चौ. मैल) |
ऑलिंपिया (ग्रीक: Ολυμπία) हे प्राचीन ग्रीसमधील एक ऐतिहासिक स्थळ आहे. ऑलिंपिक स्पर्धांचा उगम येथेच झाला. इ.स. पूर्व ७७६ मध्ये झ्यूसच्या सन्मानाप्रीत्यर्थ येथे पहिली ऑलिंपिक स्पर्धा खेळवली गेली असे मानले जाते. दर चार वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धा ११७६ वर्षांनंतर इ.स. ३९४ मध्ये थियोडोसियस पहिला ह्याने बंद केल्या.
आजही प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेच्या ज्योतीचे प्रज्वलन ऑलिंपिया येथील हीरा देवीच्या मंदिराबाहेर सूर्यकिरण वापरून केली जाते. त्यानंतर ही ज्योत ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी नेली जाते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत ऑलिंपियाचा समावेश केला गेला आहे.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील ऑलिंपिया पर्यटन गाईड (इंग्रजी)