Jump to content

ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
१२
एकूण
२८
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला .

इतिहास

१९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.

भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक भारतासाठी सर्वांत जास्त यशस्वी ठरले. यावेळी भारताला ६ पदके मिळाली (२५ मी रॅपिड फायर नेमबाजी मध्ये विजय कुमारला रौप्य पदक, ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये सुशिल कुमारला रौप्य पदक, प्रत्येकी एक कांस्य पदक १० मीटर एर रायफल नेमबाजी मध्ये गगन नारंग, महिला एकेरी बॅटमिंटन मध्ये सायना नेहवाल, ५१ किलो बॉक्सिंग मध्ये मेरी कोम आणि ६० किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त यांना मिळाले)

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल. एकूण पदकांच्या संख्येनुसार विचार केल्यास हे ऑलिंपिक भारतासाठी सर्वात जास्त यशस्वी ठरले.

सुशील कुमार हा नॉर्मन प्रितचार्ड(ज्याने ब्रिटिश राजवटीतील भारताकडून खेळताना दोन पदके जिंकली होती) नंतर एकच क्रिडाप्रकारात २ ऑलिंपिक पदके मिळविणारा पहिला भारतीय ठरला.

पदक विजेते

पदक नाव स्पर्धा खेळ प्रकार
2 रजतप्रितचार्ड, नॉर्मननॉर्मन प्रितचार्ड१९०० पॅरिसऍथलेटिक्सऍथलेटिक्सपुरुष २०० मीटर
2 रजतप्रितचार्ड, नॉर्मननॉर्मन प्रितचार्ड१९०० पॅरिसऍथलेटिक्सऍथलेटिक्सपुरुष २०० मीटर हर्डर्ल्स
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९२८ एम्सटर्डमहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९३२ लोस एंजेलेसहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९३६ बर्लिनहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९४८ लंडनहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९५२ हेलसिंकीहॉकीहॉकीपुरुष
2 कांस्यजाधव, खाशाबाखाशाबा जाधव१९५२ हेलसिंकीकुस्तीकुस्तीपुरुष फ्रीस्टाइल बॅंटाम्वेइघ्त
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९५६ मेलबर्नहॉकीहॉकीपुरुष
2 रजतराष्ट्रीय संघ१९६० रोमहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९६४ तोक्योहॉकीहॉकीपुरुष
2 कांस्यराष्ट्रीय संघ१९६८ मेक्सिकोहॉकीहॉकीपुरुष
2 कांस्यराष्ट्रीय संघ१९७२ मुनिचहॉकीहॉकीपुरुष
2 सुवर्णराष्ट्रीय संघ१९८० मोस्कोहॉकीहॉकीपुरुष
2 कांस्यपेस, लिएंडरलिएंडर पेस१९९६ अटलांटाटेनिसटेनिसपुरुष एकेरी
2 कांस्यमल्लेस्वरी, कर्णमकर्णम मल्लेस्वरी२००० सिडनीवेटलिफ्टिंगवेटलिफ्टिंगमहिला ६९ की.ग्रा.
2 रजतराठौर, राजवर्धन सिंघराजवर्धन सिंघ राठौर२००४ अथेन्सनेमबाजीनेमबाजीपुरुष डबल ट्रैप
2 सुवर्णबिंद्रा, अभिनवअभिनव बिंद्रा२००८ बीजिंगनेमबाजीनेमबाजीपुरुष १० मीटर एर रायफल
2 कांस्यकुमार, सुशिलसुशिल कुमार२००८ बीजिंगकुस्तीकुस्तीफ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा.
2 कांस्यविजेंदर सिंग२००८ बीजिंगबॉक्सिंगबॉक्सिंगमिडलवेट
2 कांस्यनारंग, गगनगगन नारंग२०१२ लंडननेमबाजीनेमबाजीपुरुष १० मीटर एर रायफल
2 रजतविजय कुमार२०१२ लंडननेमबाजीनेमबाजीपुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
2 रजतसुशिल कुमार२०१२ लंडनकुस्तीकुस्तीपुरूष फ्रिस्टाईल ६६ किलो
2 कांस्यसायना नेहवाल२०१२ लंडनबॅडमिंटनबॅडमिंटनमहिला एकेरी
2 कांस्यमेरी कोम२०१२ लंडनबॉक्सिंगबॉक्सिंगमहिला फ्लायवेट
2 कांस्ययोगेश्वर दत्त२०१२ लंडनकुस्तीकुस्तीपुरूष फ्रिस्टाईल ६० किलो
2 रजतपी. व्ही. सिंधू२०१६ रियोबॅडमिंटनबॅडमिंटनमहिला एकेरी
2 कांस्यसाक्षी मलिक२०१६ रियोकुस्तीकुस्तीमहिला फ्रीस्टाईल ५८ किलो

पदकतालिका

उन्हाळी ऑलिंपिक प्रमाणे पदक

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९०० पॅरिस
१९०४ सेंट लुइसभाग घेतला नाही
१९०८ लंडनभाग घेतला नाही
१९१२ स्टॉकहोमभाग घेतला नाही
१९२० ॲंटवर्प
१९२४ पॅरिस
१९२८ ॲम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबर्न
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
२०१२ लंडन
२०१६ रियो
एकूण१२२८

खेळाप्रमाणे पदक

Sport सुवर्ण रजत कांस्य एकूण
हॉकी3१२
नेमबाजी
ॲथलेटिक्स
कुस्ती
बॉक्सिंग
वेटलिफ्टिंग
टेनिस
बॅडमिंटन
एकूण१३२९