ऑलिंपिक खेळात जर्मनी
ऑलिंपिक खेळात जर्मनी | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके क्रम: तिसरा | सुवर्ण ३३६ | रौप्य ३७७ | कांस्य ३८६ | एकूण १०९९ |
जर्मनी देश आजवरच्या बहुतेक सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये पराभूत झाल्यानंतर जर्मनीवर १९२०, १९२४ व १९४८ सालच्या स्पर्धांमध्ये बंदी घालण्यात आली होती. १९६८ ते १९८८ दरम्यान पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी हे दोन स्वतंत्र देश वेगवेगळे संघ पाठवत होते. १९९० सालच्या पुनःएकत्रीकरणानंतर जर्मनी संघ पुन्हा एकत्र बनला.
यजमान
जर्मनीने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
स्पर्धा | यजमान शहर | तारखा | देश | खेळाडू | खेळ प्रकार |
---|---|---|---|---|---|
१९३६ हिवाळी ऑलिंपिक | गार्मिश-पाटेनकर्शन | ६ – १६ फेब्रुवारी | २८ | ६४६ | १७ |
१९३६ उन्हाळी ऑलिंपिक | बर्लिन | १ – १६ ऑगस्ट | ४९ | ३,९६३ | १२९ |
१९७२ उन्हाळी ऑलिंपिक | म्युनिक | २६ ऑगस्ट – १० सप्टेंबर | १२१ | ७,१७० | १९५ |