ऑलिंपिक खेळात जपान
ऑलिंपिक खेळात जपान | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण १३९ | रौप्य १३९ | कांस्य १५७ | एकूण ४३५ |
जपान देश काही अपवाद वगळता १९१२ सालापासून सर्व उन्हाळी व १९२८ सालापासून सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर १९४८ सालच्या उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास जपानला मनाई करण्यात आली होती. १९८० मॉस्को स्पर्धेवर अनेक देशांप्रमाणे जपानने देखील बहिष्कार टाकला होता. जपानी खेळाडूंनी आजवर एकूण ४३५ पदके जिंकली आहेत.
यजमान
जपानने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. तसेच २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तोक्योला मिळाले आहे.
स्पर्धा | यजमान शहर | तारखा | देश | खेळाडू | खेळ प्रकार |
---|---|---|---|---|---|
१९६४ उन्हाळी ऑलिंपिक | तोक्यो | १० – २४ ऑक्टोबर | ९३ | ५,१५१ | १६३ |
१९७२ हिवाळी ऑलिंपिक | सप्पोरो | ३ – १३ फेब्रुवारी | ३५ | १,००६ | ३५ |
१९९८ हिवाळी ऑलिंपिक | नागानो | ७ – २२ फेब्रुवारी | ७३ | २,१७६ | ६८ |