ऑर्कुट बुयुक्कोकटेन
ऑर्कुट बुयुक्कोकटेन (तुर्की:Orkut Büyükkökten) (फेब्रुवारी ६, इ.स. १९७६; कोन्या , तुर्कस्तान - हयात) हा संगणक अभियंता असून ऑर्कुट या लोकप्रिय संकेतस्थळाचा जनक आहे.
बुयुक्कोकटेनने संगणक अभियांत्रिकी आणि माहिती विज्ञानातील पदवी अंकारा येथील बिल्केंट विद्यापीठातून मिळवली आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक विज्ञानामधे डॉक्टरेट अर्जित केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये त्याचा संशोधनाचे विषय वेब आणि पीडीएचा वापर हे होते