ऑर्कुट
ऑर्कुट संकेतस्थळ सदस्यपृष्ठ मराठीत | |
मूळ लेखक | ऑर्कुट बुयुक्कोकटेन |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | २४ जानेवारी २००४ |
विकासाची स्थिती | चालु |
भाषा | बहुभाषिक |
सॉफ्टवेअरचा प्रकार | सोशल नेटवर्किंग |
सॉफ्टवेअर परवाना | सार्वजनिक |
संकेतस्थळ | http://www.orkut.com |
ऑर्कुट किंवा ऑर्कट (रोमन लिपी: Orkut) हे गूगल समूहाचे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाची रचना मुख्यत्वे करून नवीन मित्र बनविणे तसेच जुन्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी केली आहे. ऑर्कुट बुयुक्कोकटेन नावाच्या गूगल कर्माचा-याने ऑर्कुटची रचना केली आहे. ताच्याच नावावरून ऑर्कुट हे नाव संकेतस्थळाला दिले होते.
ऑर्कुट प्रामुख्याने भारत आणि ब्राझील या दोन देशांत लोकप्रिय होते. ऑर्कुटचा वापर जगभरात दहा कोटीहून अधिक लोक करत होते , २०१४ साली गुगल या बहुराष्ट्रीय कंपनी ने ऑर्कुट बंद करण्याची घोषणा केली व डेटा अर्काइव्ह करून बंद केले.
विशेष
ऑर्कुट उपयोगकर्ते आपल्या प्रोफाईलवर युट्युब किंवा गुगल विडीओ वरून चित्रफित जोडू शकतात आणि त्यावर टिपणीसाठी नियंत्रीत किंवा अनियन्त्रीत आधीकर उपयोगकर्ते समूहाला देऊ शकतात. तेथे G-talk (गुगलद्वारा एक त्वरित संदेश्कर्ता) जोडण्याची सोय आहे ज्याने गप्पा मारणे किंवा फाईल पाठवणे शक्य होते. सध्या G-talk ओर्कुटमध्ये जोडलेले आहे ज्याने उपयोगकर्ता थेट त्याचा ओर्कुट पानावरून गप्पा मारू शकतो.
विषय
ओर्कुटमध्ये नवीन विशेष म्हणजे विषय बदलणे. उपयोगकर्ता भव्य वाचीकेतुन रंगबेरंगी विषय पडद्यासाठी निवडू शकतो. सध्या विषय फक्त भारत, ब्राझील आणि पाकिस्तानमध्ये उपलब्ध आहेत. फेसबूकची संकल्पना भारतात आधी रुजन्या आधी बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी ऑर्कूट हे सोशल नेटवर्क वापराचे. नंतर फेसबूक ने ऑर्कूटची जागा घेण्यास सुरुवात केली. भारतात जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कूट ने बऱ्याच भारतीय थीम्स पण आणल्या.
इतर विवध विषय
सदस्य त्यांच्या इच्छेनुसार मित्रांना जोडण्यासाठी संघ तयार करू शकतात. तसेच प्रत्येक सदस्य त्यांच्या मित्रसूचीतील मित्रांना 'विश्वासू शांत आणि सेक्सी' या निर्देशांवर एक ते तीन (संकेतांवर आधारित) मुल्यान्कीत करू शकतो आणि हे शेक्देवारीत एकत्रित केले जाते. फेसबुक्च्या विपरीत ओर्कुटमध्ये कोणीही कोणाचेही प्रोफाईल भेट देऊ शकतो जर भेटदेणारा तुमच्या उपेक्षीत सूचित (आताचा बदललेले विशेष जे तुम्हाला तुमचे प्रोफाईल सर्व संघांना किंवा एखाद्या उपयोगकर्त्याला निवडण्याची संधी देते) नसेल. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सदस्य आपल्या निवडीनुसार अनुकुलीत बदल करून आपले प्रोफाईल आपल्या मित्रांना किंवा इतर (जे मित्र सूचित नाहीत) यांना काय दाखवायचे याची निवड करू शकतो आणि एक विशेष म्हणजे कोणीही सदस्य कोणत्याही इतर सदस्याला आपल्या 'क्रश सूचित' जोडू शकतो आणि त्या दोघानाही ते फक्त दोघांनी एकमेकांना त्यांच्या 'क्रश सूचित' जोद्ल्यावरच दाखवले जाते.
हे सुद्धा पहा
- फेसबूक
- गूगल क्रोम
बाह्य दुवे
- ऑर्कुट मुखपृष्ठ (इंग्लिश मजकूर)
- ऑर्कुट चे वाद (मराठी मजकूर)
- ऑर्कुट चे वाद (मराठी मजकूर)[मृत दुवा]