Jump to content

ऑरेंज वॉक जिल्हा

ऑरेंज वॉक जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑरेंज वॉक टाउन येथे आहे.

देशाच्या वायव्य भागात असलेला हा जिल्हा शेतीप्रधान असून येथे उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते तसेच येथ नारंगी, ग्रेपफ्रुट व इतर फळांच्या बागाही आहेत. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात लाकूडतोडी होत असे.

बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी चार मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.