Jump to content

ऑब्सिडियन कालमापन पद्धती

ऑब्सिडियन कालमापन पद्धती (इंग्लिश: Obsidian hydration dating; ऑब्सिडियन हायड्रेशन डेटिंग )
ऑब्सिडियम ही एक प्रकारची नैसर्गिक काच आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून ती उत्पन्न होते व ती हिरवट वा काळपट रंगाची असते. तिला उत्कृष्ट चकाकीही असते. याच्यातील कणखरपणामुळे या काचेपासून अश्मयुगीन मानवाने आपली हत्यारे बनविल्याचे आढळून येते. याशिवाय या काचेपासून बनविलेले नाकातील कानातील अलंकारही उपलब्ध झाले आहेत. युरोपमधील देशात तसेच जपानमध्ये ऑब्सिडियम आढळून येते.

ऑब्सिडियम काचेच्या पृष्ठभागावर वातावरणातील बाष्पाचा थर जमा होऊ लागतो. हा तर इतका सूक्ष्म असतो की तो नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. हा बाष्पथर म्हणजे रासायनिक प्रक्रियेने चढलेला गंज नसतो. फक्त ऑब्सिडियमच्या दगडावरच असा बाष्पथर जमतो हे एक वैशिष्ट्य आहे. या प्रक्रियेमुळे ऑब्सिडियमच्या पृष्ठभागावर पाण्याचे अतिसूक्ष्म कण जमून ते ऑब्सिडियमच्या अंतरभागात पसरतात. ऑब्सिडियममध्ये ०.१ ते ०.३ टक्के पाणी असते. पण बाष्पथर जमून हे प्रमाण वाढते. या बाष्पथराची जाडी मोजून त्या ऑब्सिडियमचे कालमापन करता येते.

.ऑब्सिडियमच्या मापनासाठी अत्यंत पातळ चकती कापून घेतली जाते. त्या चकतीच्या पृष्ठभागावरील बाष्पथराची जाडी अत्यंत सूक्ष्ममापन यंत्राने मोजतात. ऑब्सिडियन या कालमापन पद्धतीचा वापर प्रथम डोनोव्हान क्लार्क यांनी इ.स. १९६६ साली केला. त्यांनी या पद्धतीतून मेक्सिको आणि पश्चिम आशियातील काही प्रदेशातील उत्खनन अवशेषांवरून अनेक तारखा निश्चित केल्या.