Jump to content

ऑपरेशन आरवाय

ऑपरेशन आरवाय ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने आखलेली मोहीम होती. या मोहीमेत दक्षिण प्रशांत महासागरातील नौरू आणि ओशन द्वीपसमूहांवर चढाई करून ती बळकावयाचा बेत होता. ही मोहीम कॉरल समुद्राच्या लढाईनंतर लगेचच अमलात आणली जाणार होती. ऑपरेशन एमआय ही यानंतरची मोहीम होती, ज्याचे पर्यवसान मिडवेच्या लढाईत झाले.

या मोहीमेचा मुख्य हेतू वरील द्वीपे बळकावून त्यांवरील फॉस्फेटचा साठा ताब्यात घेण्याचा होता. कॉरल समुद्रात दोस्त राष्ट्रांकडून प्रखर प्रतिकार झाल्याने ही मोहीम लांबत गेली आणि शेवटी ऑगस्ट इ.स. १९४२मध्ये पार पडली.