ऑत-दा-फ्रान्स
ऑत-दा-फ्रान्स प्रदेशाचे नकाशावरील स्थान
ऑत-दा-फ्रान्स Hauts-de-France | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
ऑत-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | लील | ||
क्षेत्रफळ | ३१,८१३ चौ. किमी (१२,२८३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ६०,०९,९७६ | ||
घनता | १९० /चौ. किमी (४९० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-HDF | ||
संकेतस्थळ | www.hautsdefrance.fr |
ऑत-दा-फ्रान्स (फ्रेंच: Hauts-de-France उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्समधील सर्वात उत्तरेकडील असलेल्या ह्या प्रदेशाच्या उत्तरेस उत्तर समुद्र, पश्चिमेला इंग्लिश खाडी तर ईशान्येस बेल्जियम देश आहेत. २०१६ साली नोर-पा-द-कॅले व पिकार्दी हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.
विभाग
ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.
प्रमुख शहरे
- लील (227,560; प्रदेशाचे मुख्यालय)
- आमियां (133,448)
- रूबे (94,713)
- तूरक्वाँ (91,923)
- डंकर्क (90,995)
- कॅले (72,589)