Jump to content

ऑट्टो रेहागेल

ऑट्टो रेहागेल

ऑट्टो रेहागेल (जर्मन: Otto Rehhagel; ९ ऑगस्ट १९३८ (1938-08-09), एसेन, जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व फुटबॉल प्रशिक्षक आहे. तो २००१ ते २०१० दरम्यान ग्रीस राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होता. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली ग्रीसने युएफा यूरो २००४ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले व २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

त्याने आजवर जर्मनीच्या बुंडेसलीगामध्ये खेळलेल्या वेर्डर ब्रेमन, बोरुसिया डॉर्टमुंड, आर्मिनिया बीलेफेल्ड, बायर्न म्युनिक, १. एफ.से. काइझरस्लाउटर्न व हेर्था बे.एस.से. ह्या क्लबांना प्रशिक्षण दिले आहे. तो बुंडेसलीगाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे