ऑटोबान
ऑटोबान (जर्मन: Autobahn) ही जर्मनी देशातील नियंत्रित-प्रवेश महामार्ग प्रणाली आहे. Bundesautobahn ह्या अधिकृत नावाने ओळखल्या जात असलेल्या ह्या महामार्गांचे नियंत्रण पूर्णपणे जर्मन केंद्रीय सरकारकडे आहे. आजच्या घडीला जर्मनीमध्ये १२,९४९ किमी लांबीचे ऑटोबान अस्तित्वात आहेत. ह्या बाबतीत जर्मनीचा चीन, अमेरिका व स्पेन खालोखाल जगात चौथा क्रमांक लागतो.
इतिहास
द्रुतगती महामार्गांची संकल्पना जर्मनीमध्ये १९२० च्या दशकात वाइमार प्रजासत्ताक काळात मांडली गेली. १९३३ साली सत्तेवर आल्यानंतर ॲडॉल्फ हिटलरने ही कल्पना उचलून धरली व महामार्गांचे जाळे झपाट्याने बांधण्यास सुरुवात केली. १९३६ साली सुमारे १.३ लाख मजूर महामार्ग बांधकामात गुंतले होते. जगातील नियंत्रित-प्रवेश महामार्गांचे हे पहिलेच जाळे होते. दुसऱ्या महायुद्धकाळात अनेक ऑटोबानवरील रस्ता दुभाजक काढून टाकून हे महामार्ग लष्करी विमाने उतरवण्यासाठी वापरात आणले गेले. युद्धानंतर पश्चिम जर्मनीमध्ये उध्वस्त झालेले ऑटोबान दुरुस्त केले गेले व अनेक नवे हमरस्ते बांधण्यात आले. १९९० मधील जर्मनीच्या पुनःएकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनीमधील ऑटोबानचा दर्जा उंचावण्यात आला.
आजच्या घडीला जर्मनीतील सर्व ऑटोबानवर २ पेक्षा अधिक मार्गिका (lane) आहेत व बहुतेक सर्व मार्गांवर वेग मर्यादा नाही. २००९ पासून जर्मन सरकारने ऑटोबान रूंदीकरणाची मोठी मोहिम हाती घेतली आहे.
प्रमुख ऑटोबान
- ए१ - हाइलिंगनहाफेन, श्लेस्विग-होल्श्टाइन ते जारब्र्युकन
- ए२ - ओबरहाउसन ते बर्लिन
- ए३ - नेदरलँड्स-जर्मनी सीमेजवळील वेझेल, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन ते ऑस्ट्रिया-जर्मनी सीमेजवळील पासाउ, बायर्न
- ए४
- ए५
- ए६
- ए७
- ए८
- ए९