ऑगस्ट २६
ऑगस्ट २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३८ वा किंवा लीप वर्षात २३९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौदावे शतक
- १३०३ - अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगढ जिंकले.
एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - बुल रनची दुसरी लढाई सुरू.
विसावे शतक
- १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या टोगोलॅंड या वसाहतीवर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांनी आक्रमण केले.
- १९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
- १९६६ - नामिबियाचे स्वातंत्र्ययुद्ध - ओमुगुलुग्वोंबाशेची लढाई.
- १९७८ - पोप जॉन पॉल पहिला पोपपदी.
- १९९७ - अल्जीरियात बेनी-अली हत्याकांडात सुमारे १०० ठार.
एकविसावे शतक
- २००८ - रशियाने जॉर्जियाचे अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.
जन्म
- १९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित
- १९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ
मृत्यू
- १९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
- १९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक
- १९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिस खेळाडू
- १९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट महिना