ऑगस्ट २४
ऑगस्ट २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३६ वा किंवा लीप वर्षात २३७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पहिले शतक
- ७९ - इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम व स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाउन नष्ट.
तेरावे शतक
- १२१५ - पोप इनोसंट तिसऱ्याने मॅग्ना कार्टा रद्द केल्याचे जाहीर केले.
पंधरावे शतक
- १४५६ - गटेनबर्ग बायबलची छपाई संपूर्ण.
सोळावे शतक
- १५११ - अफोन्सो दि आल्बुकर्कने मलाक्काच्या सल्तनतीचा पाडाव केला.
सतरावे शतक
- १६०८ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे उतरला.
- १६९० - कोलकाताशहराची स्थापना.
एकोणिसावे शतक
- १८१४ - १८१२ चेयुद्ध - ब्रिटिश सैन्य अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये घुसले व व्हाइट हाउससह अनेक इमारतींची जाळपोळ केली.
- १८२१ - कोर्दोबाचा तह - मेक्सिकोच्या स्वातंत्र्ययुद्धाची सांगता.
- १८५८ - अमेरिकेच्या रिचमंड शहरात शिकल्याबद्दल ९० श्यामवर्णीय व्यक्तींना अटक करण्यात आली.
- १८९१ - थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचा पेटंट मिळवला.
विसावे शतक
- १९०९ - पनामा कालव्याचे बांधकाम सुरू.
- १९१२ - अलास्का अमेरिकेचा प्रांत झाले.
- १९२९ - तुर्कस्तान व पर्शियामध्ये मैत्रीकरार.
- १९२९ - पॅलेस्टाईनमधील वांशिक दंगलींमध्ये १०७ ज्यू व्यक्ती ठार.
- १९३१ - फ्रान्स व रशियामध्ये ना-युद्ध करार.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी पॅरिसवर हल्ला केला.
- १९५४ - अमेरिकेत कम्युनिस्ट पक्षावर बंदी.
- १९५४ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गासने आत्महत्या केल्यावर होआव काफे फिल्हो राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६० - व्होस्तोक, अंटार्क्टिका येथे जगातील सगळ्यात कमी तपमान (-८८ सेल्शियस) नोंदले गेले.
- १९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- १९६८ - फ्रांसने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला.
- १९९१ - मिखाईल गोर्बाचोव्हने सोवियेत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९९१ - युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९२ - चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले.
- १९९२ - हरिकेन अँड्रु हे कॅटेगरी ५ चे वादळ फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर आले.
- १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
एकविसावे शतक
- २००१ - एर ट्रॅन्सॅट फ्लाइट २३६ हे एरबस ए३३० प्रकारचे विमान इंधन संपल्यामुळे एझोर्स द्वीपांवर उतरले.
- २००४ - मॉस्कोच्या दॉमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेली दोन विमाने आत्मघातकी हल्लेखोरांच्या बॉम्बहल्ल्यात नष्ट. शेकडो ठार.
- २००६ - आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले.
जन्म
- १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.
- १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक.
- १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भारतीय क्रांतिकारक.
मृत्यू
- १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ
- १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू
- २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
- अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २२ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट महिना