ऑक्टोबर १६
ऑक्टोबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १७७५ - ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलंड शहर जाळले.
- १७९३ - मेरी आंत्वानेतला गिलोटिनखाली मृत्युदंड.
एकोणिसावे शतक
- १८६९ - कार्डिफ जायंटचा शोध.
विसावे शतक
- १९०५ - लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला.
- १९१६ - मार्गारेट सॅंगरने प्लॅन्ड पेरंटहूड या संस्थेची स्थापना केली.
- १९२३ - वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली.
- १९५१ - पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या.
- १९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रपूर येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
- १९७८ - जॉन पॉल दुसरा पोपपदी.
- १९९१ - कायलीन, टेक्सास येथे जॉर्ज हेनार्डने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.
- १९९६ - ग्वाटेमाला सिटीतील एस्तादियो मातियो फ्लोरेस या ३६,००० लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये ४७,००० लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीत ८४ ठार, १८० जखमी.
- १९९८ - चिलीच्या भूतपूर्व हुकुमशहा जनरल ऑगुस्तो पिनोशेला खुनाच्या आरोपाखाली लंडनमध्ये अटक.
एकविसावे शतक
जन्म
- १४३० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १८४० - कुरोदा कियोताका, जपानी पंतप्रधान.
- १८५४ - ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक.
- १८७६ - जिमी सिंकलेर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८६ - डेव्हिड बेन-गुरियन, इस्रायेलचा पहिला पंतप्रधान.
- १८९० - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
- १९१४ - झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
- १९४० - दिलीप देविदास भवाळकर, पद्मश्री पुरस्कार विजेते मराठी भौतिकशास्त्रज्ञ
- १९४४ - बॉब कॉटॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - हेमा मालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९५८ - टिम रॉबिन्स, अमेरिकन अभिनेता.
- १९५९ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
- १९७१ - डेव्हिड जॉन्सन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - जॉक कॅलिस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - सदागोपान रमेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १३५५ - लुई, सिसिलीचा राजा.
- १५९१ - पोप ग्रेगरी चौदावा.
- १७९६ - व्हिक्टर आमाद्युस, सव्हॉयचा राजा.
- १८९३ - पॅत्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५० - वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक.
- १९५९ - जॉर्ज सी. मार्शल, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, मार्शल प्लॅनचे उद्गाता.
- १९९९ - मोशे दायान, इस्रायेली सेनापती.
- १९९७ - जेम्स मिशनर, अमेरिकन लेखक.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक अन्न दिन.
- जागतिक बधिरीकरण दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर महिना