ऑक्टोबर १३
ऑक्टोबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८६ वा किंवा लीप वर्षात २८७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- ५४ - निरो रोमन सम्राटपदी.
एकोणिसावे शतक
- १८१२ - १८१२ चेयुद्ध - सर सर आयझॅक ब्रॉकच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आणि केनेडियन सैन्याने अमेरिकन सैन्याला परत अमेरिकेत रेटले.
- १८८४ - ग्रीनविचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.
विसावे शतक
- १९२३ - तुर्कस्तानने आपली राजधानी इस्तंबुलहून अंकाराला हलवली.
- १९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीतील दोस्तधार्जिण्या सरकारने पक्ष बदलून जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्यानेलात्व्हियाची राजधानी रिगा जिंकली.
- १९४६ - फ्रांसने नवीन संविधान अंगिकारले.
- १९७२ - एरोफ्लोतचे इल्युशिन आय.एल. ६२ प्रकारचे विमान मॉस्कोजवळ कोसळले. १७६ ठार.
- १९७२ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१ हे विमान चिली आणि आर्जेन्टिनाच्या सरहद्दीजवळ कोसळले. दोन प्रवाश्यांनी अनेक पर्वत पायी ओलांडून मदत मिळवल्यावर ४५ पैकी १६ व्यक्तींना डिसेंबर २३ रोजी वाचवण्यात आले.
- १९७६ - बोलिव्हियाचे बोईंग ७०७ प्रकारचे मालवाहू विमान सांता क्रुझ, बोलिव्हिया येथे कोसळले. विमानातील तिघांसह १०० ठार.
- १९७७ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी लुफ्तहंसा फ्लाइट १८१चे अपहरण करून विमान सोमालियाला नेले.
- १९८३ - अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची एटीअँडटी ) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
- १९९२ - ॲंतोनोव्ह एरलाइन्सचे ॲंतोनोव्ह ए.एन. १२४ प्रकारचे विमान क्यीव्ह जवळ कोसळले.
एकविसावे शतक
- २०११ - श्रीलंकी-अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती राज राजरत्नमला आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अटक.
- २०१३ - मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.
जन्म
- ७०९ - कोनिन, जपानी सम्राट.
- १८६४ - टेड टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - बर्नार्ड बॉसान्केट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - भुलाभाई देसाई, कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसैनिक.
- १९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता.
- १९२५ - मार्गारेट थॅचर, युनायटेड किंग्डमची पंतप्रधान.
- १९४१ - जॉन स्नो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - नुसरत फतेह अली खान, पाकिस्तानी गायक
- १९५६ - अनुरा रणसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - पेट्रस स्टीफानस तथा फानी डिव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - हितेश मोदी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
- १९८९ - स्पृहा जोशी, मराठी अभिनेत्री.
मृत्यू
- ५४ - क्लॉडियस, रोमन सम्राट.
- १७०६ - इयासस, इथियोपियाचा सम्राट.
- १८२५ - मॅक्सिमिलियन पहिला, बव्हारियाचा राजा.
- १९११ - भगिनी निवेदिता,(मार्गारेट नोबल).स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
- १९८९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
- २००३ - बर्ट्राम ब्रॉकहाउस, नोबेल पारितोषिक विजेता केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ.
- २०१८ - अन्नपूर्णा देवी, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या, मैहर घराण्यातील संगीतकार
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर महिना