ऑक्टेव लेवेनस्पील
ऑक्टेव लेवेनस्पील हे अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील निवृत एमेरिटस-प्राध्यापक असून रासायनिक प्रक्रिया आभियांत्रिकी केमिकल रिऍक्शन इंजिनिअरिंग या विषयाला विकसित करण्याचे श्रेय यांना जाते. सुरुवातिला फक्त शोधनिंबधा मध्ये मर्यादित असलेला विषयाला त्यांनी पुस्तकरूपात आणले व समजायला अत्यंत कठिण असा विषय समजण्याजोगा केला. तसेच रासायनिक उर्जाशास्त्र या अंत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विषयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना रासायनिक आभियांत्रिकीमधिल योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे आजवर १०० हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांचा जन्म १९२६ मध्ये चीन मध्ये शांघाय येथे झाला. १९५२ मध्ये त्यांनी ओरेगॉन स्टेट विद्यापीठातुन पी.एच.डी. मिळवली व त्यानंतर त्यानी तेथेच १९९१ मध्ये निवृत होइपर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले.
प्रकाशित पुस्तके
सर्व इंग्रजीत
- केमिकल रिऍक्शन इंजिनिअरिंग
- द केमिकल रिऍक्टर ओम्नीबुक
- फ्लुइडायझेशन इंजिनिअरिंग ( सलेखक -डाझिओ कुन्नी)
- इंजिनिअरिंग फ्लो ऍंड हिट एक्सचेंज
- अंडरस्टांडिग इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स