ऐरोली विधानसभा मतदारसंघ
ऐरोली विधानसभा मतदारसंघ - १५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ऐरोली मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ५, ८ ते ९, २७ ते ४२ आणि ६१ यांचा समावेश होतो. ऐरोली हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे गणेश रामचंद्र नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | गणेश रामचंद्र नाईक | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | संदीप गणेश नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | संदीप गणेश नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
ऐरोली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
संदीप नाईक | राष्ट्रवादी | ७९०७५ |
विजय लक्ष्मण चौगुले | शिवसेना | ६७११८ |
सिद्राम पांडुरंग ओहोळ | रिपाई (A) | ३०७५ |
महेशचंद्र वर्मा | बसपा | २१२८ |
भिमा हुनुमंता माने | अपक्ष | १८०९ |
वसंत शंकर म्हात्रे | अपक्ष | १७६४ |
ज्ञानदेव रामचंद्र पाटील | अपक्ष | १०६३ |
विजय चौगुले | अपक्ष | ७१४ |
हेमंत जयराम खारकर | भाबम | ५५८ |
प्रकाश नामदेव नाईक | अपक्ष | ४४७ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
- संदीप नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".