ऐरण
ऐरण (इंग्लिश: anvil, अॅन्विल ;) हे एक प्राथमिक अवजार आहे. हिच्या प्राथमिक स्वरूपात अन्य एखादी वस्तू हिच्यावर ठेवून ठोकण्याजोग्या, कठीण पृष्ठभागाच्या ठोकळ वस्तूसारखे हिचे स्वरूप असू शकते. ऐरणीतील जडत्वामुळे प्रहार करणाऱ्या अवजारातील गतिज ऊर्जेचे रूपांतर लक्ष्य वस्तूचे रूपपालटात होते. ऐरणीवरील कामांच्या स्वरूपानुसार तिला विशिष्ट आकार दिलेला असतो. लोहारकाम वा सोन्याचे काम करतांना तप्त धातू ऐरणीवर ठेवून तो हातोड्याने ठोकतात व त्या धातूला आवश्यक आकारात आणल्या जाते. लोहारकामाची ऐरण मोठी तर सोन्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी ऐरण आकारमानाने छोटी असते.
बाह्य दुवे
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या इ.स. १९११ सालातील आवृत्तीतील ऐरणीविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती