Jump to content

एस्टोनिया क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२२

एस्टोनिया क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२२
फिनलंड
एस्टोनिया
संघनायकनॅथन कॉलिन्स अर्स्लन अमजाद
२०-२० मालिका
निकालफिनलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावानॅथन कॉलिन्स (१२४)‌ अर्स्लन अमजाद (८२)
हबीब खान (८२)
सर्वाधिक बळीनवीद शहिद (३) हबीब खान (४)

एस्टोनिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडाचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. पहिला सामना फिनलंडने २३ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात देखील ११ धावांनी विजय मिळवत फिनलंडने ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१९ जून २०२२
१०:३०
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१३९/६ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
११६/४ (२० षटके)
नॅथन कॉलिन्स ४५ (४१)
हबीब खान २/३५ (४ षटके)
हबीब खान ३१ (३०)
महेश तांबे १/१५ (४ षटके)
फिनलंड २३ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: क्लाइड जॉन्स्टन (फि) आणि देबाशीश रॉय (फि)
  • नाणेफेक : एस्टोनिया, क्षेत्ररक्षण.
  • फिनलंड आणि एस्टोनिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • एस्टोनियाने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मुहम्मद इम्रान, प्रवीण कुमार (फि), अर्स्लन अमजाद, विमल द्विवेदी, एलियास हसन आणि मोहम्मद शोएब (ए) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

१९ जून २०२२
१५:००
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१८२/७ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१७१/६ (२० षटके)
नॅथन कॉलिन्स ७९ (५४)
हबीब खान २/२५ (४ षटके)
अर्स्लन अमजाद ६२ (५२)
नवीद शहिद ३/४२ (४ षटके)
फिनलंड ११ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: आदित्य अलुर (फि) आणि क्लाइड जॉन्स्टन (फि)
  • नाणेफेक : फिनलंड, फलंदाजी.