Jump to content

एस. इलावाझगी

एस. इलावाझगी
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक १९८४
जन्मस्थान व्यासरपाडी, उत्तर चेन्नई, भारत
खेळ
देशभारत ध्वज भारत
खेळकॅरम


एस. इलावाझगी (जन्म १९८४) या एक भारतीय आहेत. ज्यांनी दोनदा कॅरम विश्वचषक जिंकला आहे.[] ए. मारिया इरुदयम यांच्यानंतर तामिळनाडू राज्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कॅरम खेळाडूंपैकी त्या एक मानल्या जातात. 

चरित्र

एस. इलावाझगी यांचा जन्म १९८४ मध्ये व्यासरपाडी, चेन्नई येथे एका गरीब कुटुंबात झाला.  त्यांचे वडील ए. इरुदयराज, रोजंदारीवर कमावणारे ऑटो-रिक्षा चालक (मासळीची गाडी) आणि त्यांची आई सेल्वी या गृहिणी होत्या. त्यांच्या कुटुंबातील तीन बहिणींमध्येही त्या सर्वात मोठ्या आहेत.

कारकिर्द

इलावाझगी या तिरुवल्लूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सदस्या आहेत. त्यांनी कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.[] त्यांनी २००८ ची भारतीय राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप जिंकली. त्यांनी चेन्नई येथे झालेल्या अंतिम फेरीत माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारीला पराभूत केले होते.[][]

त्याच वर्षी, त्यांनी २००८ कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि अंतिम फेरीत पी. निर्मलाचा २५-११, २५-११ असा विजय मिळवून महिला एकेरीत विश्वविजेती बनल्या.[] इलावाझगीनेही उपांत्य फेरीत रश्मी कुमारीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २००८ च्या कॅरम विश्वचषकापूर्वी त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी के. विजयल यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली होती.[]

त्यांनी २०१२ च्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला होता. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रश्मी कुमारीविरुद्ध उपविजेते पद पटकावले होते. रश्मी कुमारीबरोबर महिला दुहेरीचे विजेतेपदही जिंकले होते.[][][]

संदर्भ

  1. ^ "Ilavazhaki. S | Deccan Chronicle". www.deccanchronicle.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Thiruvallur District Carrom Association, World Carrom Champion Academy". www.thiruvallurdistrictcarromassociation.com. 2018-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Strike and pocket queen". The New Indian Express. 2018-01-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Senior national carrom tourney in Chennai from tomorrow". Outlookindia. 2018-01-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Ilavazhagi is World champion". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2008-02-19. ISSN 0971-751X. 2018-01-04 रोजी पाहिले.
  6. ^ "5th World Championship » International Carrom Federation". www.icfcarrom.com (इंग्रजी भाषेत). 2017-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-04 रोजी पाहिले.
  7. ^ "6th World Championship » International Carrom Federation". www.icfcarrom.com (इंग्रजी भाषेत). 2017-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-04 रोजी पाहिले.
  8. ^ "ONGC::Carrom". www.ongcindia.com. 2018-01-04 रोजी पाहिले.
  9. ^ "ONGC::ONGCian emerges International 'Champion of Champions'". tenders.ongc.co.in. 2018-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-04 रोजी पाहिले.