एव्हान्सव्हिल (इंडियाना)
एव्हान्सव्हिल (इंग्लिश: Evansville) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (इंडियानापोलिस व फोर्ट वेन खालोखाल) आहे. १,१७,४२९ इतकी लोकसंख्या असलेले एव्हान्सव्हिल शहर इंडियानाच्या दक्षिण भागात इलिनॉय व केंटकी ह्या राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.