एलिस पेरी
एलिस ॲलेक्झँड्रा पेरी (जन्म ३ नोव्हेंबर १९९०) ह्या एक ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू आहेत.
त्यांनी सोळाव्यावर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि फुटबॉल संघामध्ये पदार्पण केले असल्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात लहान खेळाडू आहेत. आयसीसी आणि फिफा ह्या दोनही विश्वशाकांंमध्ये खेळणाऱ्या त्या पहिल्या खेळाडू आहेत.
२०१४ पासून त्या फक्त क्रिकेट खेळतात. त्या महिला क्रिकेटमधील आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानल्या जातात. त्या अष्टपैलू म्हणून ऑस्ट्रेलिया संघात आहेत. जलद गती गोलंदाजी आणि फलंदाजी ह्या दोन्हीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्या टी२० क्रिकेट प्रकारामध्ये एकाच वेळी १००० धावा आणि १०० बळी घेणाऱ्या पहिल्या खेळाडू आहेत. कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियातील महिलांमध्ये एका वेळी सर्वात जास्त धावा (२१३ नाबाद) हा विक्रम त्यांनी केला आहे. आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० बळी घेणाऱ्या त्या तिसऱ्या महिला खेळाडू आहेत.