एलिस पार्क स्टेडियम
एलिस पार्क स्टेडियम हे दक्षिण आफ्रिका देशाच्या जोहान्सबर्ग शहरामधील एक रग्बी युनियन व फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० पेक्षा अधिक आसनक्षमता असणारे एलिस पार्क १९२८ साली बांधले गेले अव् २००९ साली त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. १९९५ सालच्या रग्बी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना येथे खेळवला गेला होता. तसेच २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमधील ६ सामने व २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमधील ७ सामने एलिस पार्कमध्ये खेळवण्यात आले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-02-04 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत